AI क्षेत्रात ही स्त्रियांचा बोलबाला

Women And AI : तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक अशा AI तंत्रज्ञानात महिलांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. भारतातल्या आयटी क्षेत्रामध्ये AI वर आधारित असलेल्या काही कंपन्यांची स्थापना ही महिलांनी केली आहे. आणि त्या त्यांच्या कंपनी उत्तमरित्या सांभाळत आहेत.
अंतराळात प्रवास करणारे भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्ला कोण आहेत?

Group Captain Shubhanshu Shukla : अमेरिकन स्पेस एजन्सी नासा (NASA) भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर पाठवणार असल्याची माहिती इस्रोने एका निवेदनात दिली आहे. ISRO च्या Human Spaceflight Center (HSFC) ने ISS च्या आगामी Axiom-4 मिशनसाठी US-आधारित Axiom Space सोबत स्पेस फ्लाइट करार (SFA) केला आहे. या कराराअंतर्गत दोन भारतीय, एक प्राइम मिशन पायलट आणि एक बॅकअप मिशन पायलट म्हणून सहभागी होणार आहेत.
ओटीटीवरही आता सरकारी चॅनल; प्रसार भारतीने लॉन्च केलं ‘वेव्हज’ ॲप

Parsar Bharti : सरकारी प्रसार भारतीने ‘वेव्हज’ हे ॲप लॉन्च केलं आहे. Waves ॲपच्या माध्यमातून प्रसार भारतीने डिजिटल युगात पाऊल टाकलं आहे.
निवडणुकीच्या उत्सवासाठी निवडणूक आयोग सज्ज

Maharashtra Voting Day : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबरमध्ये राज्यभरात मतदान होणार आहे. राज्यभरात 9 कोटी 64 लाख 85 हजार 765 मतदार आहेत. यंदा 2 किलोमीटरच्या अंतरावर मतदान केंद्राची व्यवस्था. तर वय वर्ष 85 आणि त्यावरील वृद्ध मतदारांना आणि 40 टक्क्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांच्या घरात मतदानाच्यी सुविधा.
एलन मस्क यांच्या SpaceX ने करणार भारतीय उपग्रह GSAT-N2 चे प्रक्षेपण

GSAT-N2 : एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीने भारताचा GSAT-N2 कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केला आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, स्पेसएक्सचे फॅलकॉन-9 रॉकेट इस्रोच्या GSAT-20 उपग्रहाचे प्रक्षेपण करेल, ज्याला ‘GSAT-N2’ म्हणूनही ओळखले जाते.
भारतातील आयफोन उत्पादनात टाटाचे मोठे पाऊल

Apple : टाटा इलेक्ट्रॉनिक्सने भारताच्या टेक उत्पादन क्षेत्रात एक मोठा बदल घडवला आहे. भारतीय दिग्गज कंपनीने पेगाट्रॉनच्या चेन्नईमधील iPhone उत्पादन कारखान्यात 60 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू

Manipur Violence : गेल्या दोन दिवसापासून मणिपूरमध्ये पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा सशस्त्र दल विशेष अधिकार कायद (अफ्स्पा) लागू केला आहे. इंटरनेट सुविधा बंद केली आहे. जागोजागी पोलिसांकडून आणि लष्करी पथकांकडून सर्च ऑपरेशन्स सुरू करण्यात आली आहेत.
सुमा शिरूर यांना ‘कोच ऑफ द इयर’ पुरस्कार

Suma Shirur : सुमा शिरूर यांना इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2024 मध्ये ‘वर्षातील सर्वोत्तम महिला प्रशिक्षक’ हा बहुमान मिळाला आहे. भारतीय शूटिंग संघाला यश मिळवून देणे आणि क्रीडा क्षेत्रात लिंग समानता आणण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
IPL 2025: मेगा ऑक्शनमध्ये 574 खेळाडू, मार्की यादीत मिळालं 12 खेळाडूंना स्थान

IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये एकूण 574 खेळाडू असणार आहेत. यात 204 जागांसाठी बोली लागेल. यामध्ये 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू असणार आहेत.
राष्ट्रीय प्रेस दिवस : भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमांची जबाबदारी

Press Freedom : आपल्या राज्यघटनेमध्ये देशातील सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलं आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून; घटनेच्या कलम 19 (2) मध्ये काही निर्बंध घातले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्या अंतर्गत माध्यमांना दिलेल्या स्वातंत्र्य ही अबाधित ठेवत माध्यमकर्मीनीं जबाबदारीने या स्वातंत्र्याचा उपयोग करणं गरजेचं आहे.
भारतात धावणार पहिली हायड्रोजन ट्रेन

India First Hydrogen Train: भारतात हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन डिसेंबर 2024 मध्ये सुरू होणार आहे. ही ट्रेन डिझेल किंवा विजेवर चालणार नाही, तर हायड्रोजन ऊर्जेवर म्हणजेच पाण्यापासून वीज तयार केली जाईल आणि त्यावर ही ट्रेन चालणार आहे.
वर्षातून एकदाच धावणारी तरुण उद्योजकांची जागृती एक्सप्रेस

Jagriti Yatra : नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी, वेगवेगळ्या राज्यातल्या उद्योजकांना एकमेंकांशी जोडणं, वेगवेगळ्या व्यावसायिक कल्पनावर एकत्र काम करुन नवीन उद्योग सुरु करण्यासाठी ‘जागृती सेवा संस्थांन’ कडून जागृती रेल्वे यात्रेचं आयोजन केलं जातं.