गंगोत्री हिमनदीतील बर्फ झपाट्याने वितळत आहे का?

Gangotri Glacier : हिमनदींनी भरलेल्या जलविज्ञान प्रणालींच्या गतिमानतेत बदल झाला आहे. हिमनद्यांच्या रचनेमध्ये बदल घडत आहेत. त्यातून होणाऱ्या पाण्याचा प्रवाहही बदलत आहे. हवामानातील बदलांमुळे वरचेवर ढगफुटी सारख्या घटना घडूही शकतात. हे नाकारता येत नाही. तरी अशा संशोधनात्मक अभ्यासातून स्पष्ट झालेल्या निष्कर्षानुसार हिमनदीने भरलेल्या नदी खोऱ्यांमध्ये जलसंपत्ती व्यवस्थापन धोरणे वाढविण्यासाठी सतत क्षेत्रीय देखरेख आणि प्रारुपांची आखणी करुन उपाययोजना राबवणे ही तातडीची गरज आहे.
[gspeech type=button]

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील हिमनदीशास्त्रज्ञ हिमनदी वितळण्याच्या परिणामाचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासादरम्यान मध्य हिमालयातील भागीरथी नदीच्या पाण्यामध्ये योगदान देणाऱ्या वरच्या गंगा खोऱ्याचा स्रोत असलेल्या गंगोत्री हिमनदी प्रणालीची (GGS) पुनर्रचना केली आहे.

गंगोत्री हिमनदी प्रणाली का महत्त्वाची आहे?

हिंदू कुश हिमालयातील बर्फ आणि बर्फाचे साठे हे सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्यांना आधार देणारे पाण्याचे महत्त्वाचे स्रोत आहेत. अलिकडच्या दशकांमध्ये या प्रदेशात लक्षणीय हवामान बदल आढळले आहेत. यामुळे हिममंडल (बर्फाच्छादित प्रदेशाचं रुप) आणि जलचक्र बदललेलं आहे. याचा अर्थ हिमनदींनी भरलेल्या जलविज्ञान प्रणालींच्या गतिमानतेत बदल झाला आहे. हिमनद्यांच्या रचनेमध्ये बदल घडत आहेत. त्यातून होणाऱ्या पाण्याचा प्रवाहही बदलत आहे. अशा बदलांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ नद्यांच्या मोठ्या पाणलोटांवर लक्ष केंद्रित करतात. नद्यांचा आकार, त्यांच्या प्रवाहाचं मूल्यांकन आणि बर्फ वितळण्याची प्रक्रिया, पर्जन्यमानाच्या कालावधीचा अंदाज बांधणे आव्हानात्मक आहे. गंगोत्री हिमनदी प्रणालीसारख्या तुलनेने लहान प्रणालींमध्ये याचा अंदाज लावणे सोपं आहे आणि म्हणूनच जलशास्त्रज्ञ आणि हवामान शास्त्रज्ञांमध्ये हा एक लोकप्रिय पर्याय आहे.

असं म्हटलं जाते की, दीर्घकालीन पाण्याच्या प्रवाहाचं विश्लेषण, वितळलेल्या पाण्यामुळे पडलेली भर आणि गंगोत्री हिमनदी प्रणालीला प्रभावित करणारं अन्य हवामान घटक समजून घेण्यास संशोधक अद्याप कमी पडत आहेत. ‘गंगोत्री हिमनदी प्रणालीतून बर्फ आणि हिमनदी वितळण्याचे जलविज्ञान योगदान आणि 1980 पासून त्यांचे हवामान नियंत्रण’ हा सध्याचा अभ्यास, इंदौर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमेरिकेतील युटा आणि डेटन विद्यापीठे आणि काठमांडू इथलं इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट इथलं संशोधकांच्या नेतृत्वाखाली केला जात आहे. हा अभ्यास जर्नल ऑफ द इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेन्सिंगमध्ये प्रकाशित झाला आहे.

हे ही वाचा : उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीचा हाहाकार ! ढगफुटीमागे नेमकं कारण काय?

या अभ्यासात काय आढळले?

या अभ्यासात हाय-रिझोल्यूशन हिमनदी-जलविज्ञान मॉडेल, ज्याला स्पेशियल प्रोसेसेस इन हायड्रोलॉजी (SPHY) म्हणतात, ते वापरून गंगोत्री हिमनदी प्रणालीच्या दीर्घकालीन डिस्चार्ज ट्रेंडची पुनर्रचना केली आहे. हे पर्जन्य-प्रवाह, बाष्पीभवन आणि क्रायोस्फेरिक प्रक्रिया यासारख्या स्थलीय जल संतुलन प्रक्रियांचं अनुकरण करते. 1980-2020 च्या भारतीय मान्सून डेटा अ‍ॅसिमिलेशन अँड अॅनालिसिस (IMDAA) डेटासेटसह ही माहिती एकत्रित केली आहे. या माहितीचं पुन्हा विश्लेषण केलं. यामध्ये वातावरणात वर्षागणिक घडत गेलेल्या बदलांचा इतिहास नमूद केलेला आहे. निरीक्षणात्मक माहिती ही संख्यात्मकरित्या मांडून ती सादर केली जाते. त्यांच्या विश्लेषणातून असं आढळलं की, जास्तीत जास्त गंगोत्री हिमनदी प्रणालीचा प्रवाह उन्हाळ्याच्या महिन्यांत होतो. जुलैमध्ये त्याची शिखर प्रति सेकंद 129 घनमीटर असते. सरासरी वार्षिक GGS डिस्चार्ज 28±1.9 m3/s असा अंदाज लावण्यात आला होता. ज्यामध्ये 1980-2020 मध्ये बर्फ वितळणे 64 टक्के, त्यानंतर हिमनदी वितळणे 21 टक्के, पाऊस-प्रवाह 19 टक्के आणि बेस फ्लो 4 टक्के असे हिस्से होते.

त्यांच्या अभ्यासात असं आढळलं की, 1990 नंतर ऑगस्ट ते जुलै या कालावधीत पाण्याच्या विसर्जनाच्या शिखरात दशकीय विसर्जन विश्लेषणात बदल झाला. ज्यामुळे हिवाळ्यातील पर्जन्यमानात घट होत गेली तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला हिमनग वितळण्याचं प्रमाण वाढलं.

1991 ते 2000 आणि 2001 ते 2010 पर्यंत सरासरी, दशकीय GGS डिस्चार्जमध्ये 7.8 टक्क्याची सर्वाधिक व्हॉल्यूमेट्रिक वाढ झाली आहे. सरासरी वार्षिक तापमान वाढलं असलं तरी, सरासरी वार्षिक पर्जन्यमान किंवा हिमनदी वितळण्यात कोणताही महत्त्वपूर्ण ट्रेंड दिसून आला नाही. तापमानवाढ असूनही, बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी झालं. मुख्यतः सरासरी बर्फाच्या आच्छादन क्षेत्रात घट झाल्यामुळे, तर 1980 ते 2020 दरम्यान GGS वर पर्जन्याचा प्रवाह आणि पाणी पातळी वाढली. सांख्यिकीय विश्लेषणातून असं दिसून आलं की, GGS चा सरासरी वार्षिक प्रवाह प्रामुख्याने उन्हाळ्यातील पर्जन्यमान आणि त्यानंतर हिवाळ्यातील तापमानाद्वारे नियंत्रित केला जातो.

हेही वाचा : हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये निसर्गाचा आक्रोश

कोणत्या हिमनद्यांनी GGS बनवले आहे?

GGS च्या अभ्यास क्षेत्रात मेरू (7 किमी 2 ), रक्तावरण (30 किमी 2 ), चतुरंगी (75 किमी 2 ) आणि सर्वात मोठी हिमनदी गंगोत्री (140 किमी 2) यांचा समावेश आहे. GGS 549 चौरस किमी (किमी 2 ) क्षेत्र व्यापते आणि 3,767 मीटर ते 7,072 मीटर उंचीवर पसरते. GGS चा सुमारे 48 टक्के भाग हिमनदीयुक्त आहे. GGS मध्ये हिवाळ्यात (ऑक्टोबर ते एप्रिल) पश्चिमी वातावरणांमुळे आणि उन्हाळ्यात (मे ते सप्टेंबर) भारतीय उन्हाळी मान्सूनमुळे पर्जन्यवृष्टी होते. 2000 ते 2003 या कालावधीत सरासरी सरासरी तापमान 9.4 अंश सेल्सियस असताना सरासरी हंगामी पाऊस (मे ते ऑक्टोबर) सुमारे 260 मिमी आहे.

अभ्यासातील निष्कर्षांचे परिणाम

पावसाचा प्रवाह आणि बेस फ्लोमुळे GGS मध्ये वेगवेगळे बदल दिसून आले. तापमानवाढीमुळे जलशास्त्रामध्ये होणारे बदल स्पष्ट करतात. यावर्षी उन्हाळी मान्सून उत्तर भारतात विशेषतः तीव्र राहिला आहे आणि जून ते ऑगस्ट या कालावधीत नेहमीपेक्षा जवळजवळ 25 टक्के जास्त पाऊस पडला आहे. उत्तराखंड, जम्मू आणि हिमाचल प्रदेशात तीव्र पुराच्या अनेक घटना घडल्या आहेत.

योग्य उपकरणे किंवा उपग्रह प्रतिमा नसतानाही, राज्य अधिकारीवर्ग या घटनांना ‘ढगफुटी’ असं नाव देतात. जेव्हा एखाद्या 30 चौरस किमी पेक्षा कमी भौगोलीक क्षेत्रात एका तासात 10 सेमी पेक्षा जास्त पाऊस पडतो तेव्हा त्याला ढगफुटी असं म्हणतात.

हवामानातील बदलांमुळे वरचेवर ढगफुटी सारख्या घटना घडूही शकतात. हे नाकारता येत नाही. तरी अशा संशोधनात्मक अभ्यासातून स्पष्ट झालेल्या निष्कर्षानुसार हिमनदीने भरलेल्या नदी खोऱ्यांमध्ये जलसंपत्ती व्यवस्थापन धोरणे वाढविण्यासाठी सतत क्षेत्रीय देखरेख आणि प्रारुपांची आखणी करुन उपाययोजना राबवणे ही तातडीची गरज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ