अ‍ॅक्सिऑम-4 या खाजगी मिशनद्वारे भारतीय अंतराळवीर चार दशकानंतर इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये!

[gspeech type=button]

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे अ‍ॅक्सिऑम-4 मिशन द्वारे बुधवार, 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकरता रवाना झाले. नासाने Axiom मिशन-4 (Ax-4) ला अमेरिकेतील फ्लोरिडा इथल्या कॅनेडी स्पेस सेंटरमधून यशस्वीपणे लाँच केलं. अ‍ॅक्सिऑम स्पेस कंपनीद्वारे नियोजित अ‍ॅक्सिऑम-4 (Axiom Mission 4 – Ax-4) हे एक खासगी अंतराळ मिशन आहे. हे मिशन स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे क्रू ड्रॅगन अंतराळयानातून प्रक्षेपित करण्यात आले.

स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) साठी भारतीय वेळेनुसार बुधवार, 25 जून रोजी दुपारी 12.01 वाजता या मिशनने उड्डाण केलं. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे या मिशनचे पायलट आहेत. त्यांच्यासोबत आणखी तीन अंतराळवीरही स्पेस स्टेशनला जात आहेत. या मिशनद्वारे 60 प्रयोग करण्यात येणार असून यातील 7 प्रयोग हे इस्रोसाठीचे आहेत. भारताच्या अंतराळ भविष्याच्या दृष्टीनं हे मोठं पाऊल आहे.

भारताचा 500 कोटी रुपयांचा खर्च!

Axiom मिशन-4 करता शुभांशु शुक्ला यांच्या जागेकरता इस्रोने किमान 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. हे मिशन भारताच्या अंतराळातील प्रयोग आणि इतर गोष्टींना वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास इस्रोचे प्रमुख व्ही नारायण यांनी व्यक्त केला आहे. प्रशिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दिशेनं हे मोठं पाऊल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शुभांशु शुक्ला हे या मिशनचे पायलट आहेतच याशिवाय ते पुढील चौदा दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 60 प्रयोगांमध्ये भाग घेणार आहेत. यातील 7 प्रयोग हे इस्रोद्वारे आखण्यात आले आहेत. यात मायक्रोअलगी (जीवजंतू), स्पेसमध्ये स्नायूंची क्षमता कमी होणे, तांदूळ आणि इतर बियाणांचा विकास आणि टार्डिग्रेडसारख्या जीवजंतूची क्षमता या गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे. भारताच्या गगनयान मिशन आणि भारतीय अंतरिक्ष स्टेशनकरताही (BAS) या मिशनमधील माहितीचा उपयोग होईल. या मिशनमुळे चार दशकानंतर भारताला इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये प्रवेश मिळत आहे.

 

स्पेसमध्ये शेती करता येणार!

या प्रयोगांमुळे अंतराळामध्ये शेती करता येणे, दीर्घकाळासाठी अंतराळात वास्तव्य, यामुळे शरीर व मानसिक आरोग्यावर होणार परिणाम आणि अंतराळात राहण्याकरता कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल या बाबी शोधण्यात मदत होईल.

अ‍ॅक्सिऑम-4 मिशन नेमकं काय आहे?

अ‍ॅक्सिऑम-4 मिशन म्हणजेच Ax-4 ही एक खाजगी अंतराळ मोहीम आहे. अमेरिकेतील खाजगी कंपनी Axiom Space ने ही मोहीम आयोजित केली आहे. स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेट आणि क्रू ड्रॅगन कॅप्सूनद्वारे हे मिशन आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाईल. शेती, मानवी आरोग्य, तंत्रज्ञान, शिक्षण आणि व्यावसायिक प्रयोगांवर या मोहिमेत भर देण्यात आला आहे. भविष्यात अवकाशातील पर्यटनाकरता आवश्यक बाबींची माहितीही या प्रयोगांमधून मिळेल.  या मोहिमेत भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरीमधील अंतराळवीर सहभागी झाले आहेत. Ax-4 मिशन दरम्यान हे अंतराळवीर स्पेस स्टेशनमधून विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत थेट संवाद साधतील. मुलांना यामुळं अंतराळातील प्रयोगांबद्दल उत्सुकता निर्माण होईल आणि भविष्यातील तरुण संशोधकांना प्रेरणा मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

GST : या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने आयकर मध्ये थोडी सूट दिली होती. आणि आता केंद्र सरकार आणखी एक मोठा
Krishi Sakhi Yojana:आपल्या देशातील महिलांना शेतीत अधिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव
Jahnavi Dangeti Astronaut : आंध्रप्रदेशातील 23 वर्षीय जान्हवी डांगेती हिची 2025 च्या प्रतिष्ठित टायटन्स स्पेस ॲस्ट्रोनॉट क्लाससाठी अंतराळवीर उमेदवार (अस्कॅन)

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ