आयपीएल 2025; तारीख जाहीर

IPL 2025 : आयपीएल (IPL 2025) अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनची सुरूवात लवकरच होणार आहे. रविवार, 12 जानेवारी 2025 रोजी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याची तारीख जाहीर करण्यात आली.
[gspeech type=button]

आयपीएल (IPL 2025) अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनची सुरूवात लवकरच होणार आहे. रविवार, 12 जानेवारी 2025 रोजी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याची तारीख जाहीर करण्यात आली.

राजीव शुक्ला यांनी पत्रकारांना सांगितले की, आयपीएल 2025 ची सुरुवात 23 मार्चला होईल आणि अंतिम सामना हा 25 मे रोजी खेळला जाईल. परंतु अजून या सीजनमधील पहिला सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल हे सध्या निश्चित झालेले नाही.

बीसीसीआयच्या (BCCI ) या बैठकीत माजी क्रिकेटर देवजीत सैकिया यांची सचिवपदी आणि प्रभजीत सिंग भाटिया यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीनंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याविषयी माहिती दिली.

तसेच विमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन कुठे होणार, हे देखील निश्चित करण्यात आलं आहे. त्याबाबतही लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असं शुक्ला यांनी सांगितलं.

सौदी अरेबियामध्ये आयपीएल 2025 चा मेगा लिलाव

आयपीएल 2025 साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये मेगा लिलाव पार पडला. यामध्ये 577 खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यातील 182 खेळाडूंना संघांनी विकत घेतले. फ्रंचायझींनी यासाठी 639.15 कोटी रुपये खर्च केले. आणि यंदाही स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असेल.

येत्या 18-19 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची निवड होईल. भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे.

आयपीएल 2024

2024 मध्ये आयपीएल सामन्यांना 22 मार्चपासून सुरुवात झाली होती. या सीजनमधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. त्यानंतर, 26 मे रोजी अंतिम सामना खेळवला गेला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर
Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल, तर आता तुमचं सामान किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कारण,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ