2024 मध्ये इतिहास घडवणाऱ्या महिला खेळाडू

Women Athletes : 2024 हे वर्ष महिला खेळाडूंनी चांगलंच गाजवलं आहे. या वर्षात अनेक महिला खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने इतिहास घडवला आहे.
[gspeech type=button]

2024 हे वर्ष महिला खेळाडूंनी चांगलंच गाजवलं आहे. या वर्षात अनेक महिला खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने इतिहास घडवला आहे. भारतात आणि परदेशातही उत्तम कामगिरी करणाऱ्या या महिला कोण आहेत ते पाहुयात..

डायना पुंडोले

पुण्यातील डायना पुंडोले या नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. त्यांनी एमआरएफ सलून्स श्रेणीत 2024 च्या इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये पहिली पोझिशन मिळवली. कॉम्पिटिटिव्ह रेसिंग हे क्षेत्र पुरुषांसाठीच असल्याचा टॅबू त्यांच्या विजयामुळे पुसला गेला आहे. डायना यांच्या कामगिरीमुळे अधिकाधिक महिला कार रेसिंगमध्ये येण्याची आशा निर्माण झाली आहे.

मनु भाकर

भारतीय नेमबाज मनु भाकर यांनी सतत उत्तम कामगिरी करत खेळ आणि विजयातील सातत्य कायम ठेवलं. विशेषतः पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यामुळे त्या नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.

शीतल राज

शीतल राज यांनी 8,988 मीटर उंच माउंट चो ओयू शिखरावर चढाई करून पहिल्या भारतीय महिला होण्याचा मान मिळवला. हे पर्वत नेपाळ-तिबेट सीमेवर स्थित आहे आणि ते जगातील सहावे सर्वात उंच शिखर आहे.

रूपा बेयोर

रूपा बेयोर या टॉप 10 पूम्से रँकिंगमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय तायक्वांडो खेळाडू ठरल्या आहेत. सध्या त्या जागतिक रँकिंगमध्ये 9 व्या स्थानावर आहेत. 2021 मध्ये 123 व्या स्थानावरून त्या आत्ता टॉप रँकिंगमध्ये पोहोचल्या आहेत.

प्रीती पाल

केवळ 23 वर्षांच्या वयात, प्रीती पाल यांनी पॅरिस 2024 पॅरालिम्पिक्समध्ये महिलांच्या 100 मीटर आणि 200 मीटर T35 प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताचे नाव उंचावले आहे.

अवनी लेखरा

अवनी लेखरा यांनी पॅरालिम्पिक खेळात मोठी कामगिरी केली आहे. 10 मीटरच्या एअर पिस्तुल स्पर्धेत त्यांनी दोन पदके जिंकली, एक सुवर्णपदक आणि दुसरे कांस्यपदक. पॅरालिम्पिकमध्ये एकाच स्पर्धेत दोन पदके मिळवणाऱ्या अवनी या पहिल्या महिला खेळाडू आहेत.

या सर्व महिला खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने जगासमोर आपले नाव कोरले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ