लोकशाही नॉट रिचेबल…

Democracy not reachable : मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना लोकशाही नॉट रिचेबल झालीय. तिला कुठे शोधू?
दमदार म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचे 15 सूत्रे

Mutual fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना संयम ठेवणे अतिशय महत्त्वाचं असते. म्युच्युअल फंड हा ट्रेडिंग करण्याचा भाग नसून या मध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करुन अधिकाधिक नफा मिळवला जातो. गुंतवणुकीच्या या पर्यायामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक करुन संपत्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्स खास आपल्यासाठी या लेखामध्ये दिल्या आहेत.
कोचीनमधले मराठी बांधव!

Marathi Community in Kerala : गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आल्यानंतर तिथल्या कोकणी लोकांसोबतच या मराठी भाषिकांनी पहिल्यांदा केरळच्या किनारपट्टी जवळच्या भागामध्ये स्थलांतर केले असे मानले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या गावाचा कोचीनशी जवळचा संबंध असल्याची माहिती मिळते. अठराव्या शतकाच्या अखेरीस फडके, शिर्के, बोरवणकर अशी अनेक कुटुंब वेंगुर्ल्याहून कोचीनला स्थलांतरित झाली.
2024 सालचे सुपरहिट सिनेमा

Superhit 2024 Movies : 2024 हे वर्ष बॉलीवूडसाठी संमिश्र होतं. एकूण मिळून हजार एक चित्रपट तयार होणाऱ्या या इंडस्ट्रीमध्ये केवळ 6 सिनेमांनाच सुपरहिटचं लेबल लागलं आहे. तर दाक्षिणात्या पुष्पा 2 सिनेमाने अनेक विक्रम रचले आहेत.
बासमती : भारताचा की पाकिस्तानचा

Basmati rice : बासमती तांदळाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. या तांदळाला जीआय टॅग मिळावा यासाठी भारताने युरोपियन युनियनच्या अर्ज दाखल केला आहे. मात्र, पाकिस्तानने यामध्ये खोडा घालत्यामुळे आता भारत-पाकिस्तानमध्ये हा वाद सुरू आहे.
ऋग्वेदातील सूर्य देवता

Surya devta : सूर्याच्या मकरसंक्रमणाचा दिवस म्हणजे मकरसंक्रांती. म्हणजेच या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ह्या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
घोरणे हे आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते

Snoring a health Issue : घोरणारी माणसे तशी सुखी असतात. कारण ते घोरतात किंवा किती मोठ्या प्रमाणात घोरतात हे त्यांना स्वतःला कधीच समजत नाही. अधून मधून घडणारे घोरणे हे तेवढे धोकादायक नसते. मात्र हे घोरणे नियमितपणे घडत असेल आणि त्यामुळे झोप व्यवस्थित होत नसेल तर अशावेळी मात्र ते आरोग्य समस्येचे एक लक्षण असू शकते.
फेक रिव्ह्यूपासून सावध रहा !

Fake reviews : ऑनलाइन खरेदी करताना फेक रिव्ह्यू म्हणजेच खोटे रिव्ह्यूज ओळखणे हे खूप महत्त्वाचे असते. फेक रिव्ह्यू ग्राहकांची दिशाभूल करू शकतात आणि त्यातून चुकीची खरेदी होऊ शकते. त्यामुळे या फेक रिव्ह्यूंपासून सावधान राहणे आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
विणीच्या हंगामात रुप बदलणारे राखी बगळे

Grey heron : बगळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर गाई-म्हशींच्या आसपास उडणारे ‘गाय बगळे’ लक्षात येतात. हे गाय बगळे गावात आणि शहरामध्ये सुद्धा सहज दिसून येतात. या गायबगळ्यांचा मोठा भाऊबंद असतो तो राखी बगळा. हा राखी बगळा पाणथळींच्या ठिकाणी सहज आढळतो. पाणथळीचा हा भाग गोड्या किंवा खाऱ्या कोणत्याही प्रकारचा असला तरी त्याठिकाणी हा राखी बगळा पाहायला मिळतो.
महाराष्ट्रातली पहिली अॅस्ट्रोप्रुन्यर- श्वेता कुलकर्णी!

Shweta Kulkarni Astronomy : अस्ट्रॉनॉमीची विद्यार्थिनी आणि खगोलशास्त्र लोकांपर्यंत पोहोचवण्याची पॅशन असलेली, अद्याप तिशीतही न पोहोचलेली तरूण आंत्र्यप्रुन्यर अर्थात अॅस्ट्रोप्रुन्यर- श्वेता कुलकर्णी.
पर्माकल्चरचं करायचं काय?

Permaculture : पर्माकल्चरची रचना ही फक्त एका शेतापुरती मर्यादित नसून एकूण मानवजातीच्या भल्यासाठी आहे तेंव्हा जास्तीतजास्त लोकांपर्यंत सुनियोजित पद्धतीने हा विचार कसा पोहोचेल असा विचार सुरुवातीपासूनच मॉलिसन आणि होमग्रेन ह्या जोडगोळीने केला. पर्माकल्चर शिकण्या-शिकवण्याची सुनियोजित पद्धत अमलात आणली गेली. त्यातील सर्वात मुलभूत कोर्स आहे PDC.
पॉपकॉर्न कराची लाही लाही

पॉपकॉर्न सर्वसामान्यांचं अन्न नाही. कॅरॅमलाइज्ड पॉपकॉर्न तर अजिबात नाही. पण लाह्या आपलं प्राचीन खाद्य. ते मिठाईत तब्दील होतं तेव्हा जी रसनिष्पत्ती होते तेव्हा त्याचा गोडवा जीएसटी स्वरूपात केंद्राच्या जीभेवरही रेंगाळत राहतो.