एंड्रोपॉज(Andropause):पुरुषांमधील वाढत्या वयातील बदल

Andropause : एंड्रोपॉज हा शब्द पुरुषांमधील वयानुसार येणाऱ्या हार्मोनल बदलांसाठी वापरला जातो. वयोमानानुसार किंवा काही आजारांमध्ये टेस्टोस्टेरॉन (Testosterone) या पुरुष हार्मोनच्या पातळीत घट होते. साधारणपणे 40 ते 50 वयानंतर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण दर वर्षी 1% कमी होऊ लागते. याला कधीकधी ‘पुरुषांचा मेनोपॉज’असेही म्हणतात.

कीटकनाशक उद्योगातील व्यावसायिक विक्री व्यवस्थापन भाग – 2

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या सहाव्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगातील व्यावसायिक विक्री व्यवस्थापनाविषयी माहिती दिली आहे.

उद्याचा ग्रामीण महाराष्ट्र – गरजा आणि उपाय

पंचायतराज व्यवस्था भारतात लागू होऊन बराच काळ लोटला आहे. सरकारतर्फे कायदे आणि त्यांची अंमलबजावणी केली जाते. मात्र तळागाळातील लोक सहभाग आणि प्रशासनाचा पाठिंबा याशिवाय त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणार नाही. गावविकासाला चालना देणारं नेतृत्व लोकांमधून निर्माण होणं गरजेचं आहे. गावच्या केवळ आजच्या नाही तर पुढील पन्नास वर्षांच्या गरजा काय असतील याचा विचार व्हायला हवा.

आपल्या आजाराची कारणं समजून घ्या

Healthy Lifestyle : आपल्या रोजच्या सवयी, खाद्यपदार्थांची निवड, विश्रांतीचा अभाव, व्यसनाधीनता आणि चुकीची जीवनशैली यांचा शरीरावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही कोणती औषधं घेत असाल तर मद्यपान न करणे, विसंगत असलेल्या अन्नपदार्थाचं एकत्र सेवन करणं गरजेचं असतं. याविषयीची सखोल माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

जगन्नाथ पुरी रथयात्रा, पत्नीला वर्षातून एकदाच दर्शन!

ओडिशाच्या प्रत्येक गावात जगन्नाथाची मंदिरं आहेत. पण जगन्नाथ म्हणजे विष्णू. पण जगन्नाथाच्या मंदिरांमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी लक्ष्मी नसून त्याचे बहिण, भाऊ आहेत. काही दुर्गम भागात जगन्नाथाची मंदिरे नाहीत. पण अशा वेळेस एखादे झाड जे जमिनीतून उगवतानाच तीन खोडांसहित उगवले आहे, अशा झाडाला जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेचा अंश मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते.

धडपड पाळीच्या पर्यावरणस्नेही उत्पादनांसाठी

Women : पाळीसारख्या गोष्टीबाबत गैरसमज, अंधश्रद्धा, कोणते प्रॉडक्टस वापरावेत, सॅनिटरी नॅपकिन्समुळे पर्यावरणाची होणारी हानी या गोष्टींबाबत माहिती असणं ही तर फार दूरची गोष्ट. हाच मुद्दा लक्षात घेऊन गेली 12 हून अधिक वर्षे मासिक पाळीसाठी पर्यावरणस्नेही उत्पादने वापरणे का महत्त्वाचे आहे, मासिक पाळी व्यवस्थापन म्हणजे काय? यावर राजसी कुलकर्णी दिवाकर करत असलेले काम मोलाचे आहे.

कीटकनाशक उद्योगातील व्यावसायिक विक्री व्यवस्थापन

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या पाचव्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगातील व्यावसायिक विक्री व्यवस्थापनाविषयी माहिती दिली आहे.

अरेच्चा ! डॉक्टरांनी तर मला हे सांगितलंच नाही

Medicine Side Effects : अनेकदा रुग्ण म्हणून आपण डॉक्टरांनी दिलेली औषधं नित्यनेमाने घेत असतो. दीर्घकाळ घेतल्या जाणाऱ्या औषधांमध्ये काहिक वेळेला आपण सर्दी, खोकला, ताप आला असेल तर काही वेगळी औषधं डॉक्टरांचा सल्ला न घेता घेतो, किंवा जरी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली असली तरी त्यांना आणखीन कोणती औषधं सुरु आहेत याची माहिती देत नाही. या वेगवेगळ्या औषधांचा आपल्या शरिरावर एकत्रित दुष्परिणाम होत असतो. याची आपल्याला कल्पनाच नसते.याबद्दलच आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. 

जगन्नाथपुरीचं मूळ आदिवासी परंपरेत !

Jagannath Puri: आदिवासी समुदायांच्या देवता खांब, वृक्ष अशा स्वरुपात असतात. जगन्नाथाच्या लाकडी मूर्तींच्या संदर्भात त्यांचा उगम शोधण्यामागे, आदिवासी परंपरांचा आधार घेत गृहीतके मांडली गेली. जगन्नाथाच्या मंदिरांमध्ये लाकडी खांबांनाच मानवाकृती रूप देण्यात आले आहे आणि त्यांचे रूपांतर पुढे मूर्तीमध्ये झाले आहे असे आढळून येते.

 सिकल सेल आजार : एक अनुवंशिक रोग!

Sickle cell anemia : जगात, सिकल सेल आजार हा एक जनुकीय (genetic) आजार असून मुख्यतः आफ्रिका, मध्य पूर्व भारत आणि काही दक्षिण अमेरिकन देशांमध्ये दिसतो. जगभरात अंदाजे 80 लाख लोक या आजाराचे वाहक (carriers) आहेत, आणि 30 लाखाहून अधिक लोक सिकल सेल अ‍ॅनिमियाने त्रस्त आहेत. जगभरात दरवर्षी साधारण तीन लाख बालकं या आजारासह जन्म घेतात.

भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT विश्लेषण

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT विश्लेषण करून या उद्योगांसमोर असलेली आव्हाने आणि विकासाच्या संधी यांची माहिती करून दिली आहे.

परिवर्तन घडवून आणणारी गावातील वाचनालये

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा गावात वाचनालय हे सशक्त विकासाचं माध्यम ठरतं.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ