आर्य-द्रविड भाषांचे साहचर्य – तंजावर मराठी

Thanjavur Language : तमिळ आणि कन्नड भाषांचा शाब्दिक प्रभाव आहे अशी मराठीची एक बोलीभाषा म्हणून ‘तंजावर’ भाषा प्रचलित आहे. तंजावर जिल्ह्यात आणि भारतातील तामिळनाडू राज्यात इतरत्र बोलल्या जाणाऱ्या मराठीचे किमान एक लाख भाषक आहेत.
खंडोबाची विविध प्रतिकं

Khandoba : खंडोबाने मणी-मल्लावर विजय मिळवला तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी. खंडोबाचे लिंग, तांदळा आणि टांक अशा स्वरुपात पूजन करण्यात येते. आपल्या खंडोबाच्या टांकावर जर्मन अभ्यासकाने संशोधन केलं आहे. खंडोबाची पूजेतली विविध प्रतिकं आणि त्यांचे संदर्भ चंपाषष्ठीनिमित्त
रसास्वाद

देवाणघेवाणीत कित्येक परदेशी पदार्थ आणि कच्चा माल आपल्या आजच्या जेवणाचा भाग इतके सहज झाले की त्यांच्याशिवाय आज आपलं ताट अतिशय संकुचित झालं असतं.
सजग राहा, डिजिटल अरेस्टपासून!

Digital arrest : डिजिटल युगात सायबर क्राइमची समस्या अधिक गंभीर होत आहे, परंतु योग्य सायबर सुरक्षा उपाययोजना आणि सजगता ठेवून आपण या समस्येवर नियंत्रण ठेवू शकतो. डिजिटल अरेस्टसारख्या गोष्टी रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक सगळ्यांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे.
‘बाबू रेशिम’ मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला गँगस्टर

Babu Reshim : मुंबईतल्या BRA गँगमधला B म्हणजेच बाबु रेशिम, ज्याच्या आयुष्यापेक्षा त्याचा मृत्यू जास्त गाजला असा एक गँगस्टर. मुंबई पोलिस आणि अंडरवर्ल्ड दोघांनाही हादरवून सोडणारं एक एन्काउंटर, जे घडवून आणलं होतं पोलिस कोठडीत.
कोण जिंकणार? मानव की सूक्ष्मजंतू?

Humans and microbes : सूक्ष्म जीवांची ही दुनिया आपल्या नजरेपलीकडची आहे. ते सूक्ष्मदर्शक यंत्र वापरल्याखेरीज आपल्या नजरेस पडत नाहीत. आणि त्यामुळे त्यांचे अस्तित्व आपणास नेहमी जाणवत नाही.
कंदील माशी

lantern fly : कंदील माशी. नावावरुन आपल्या ही एखादी माशी असावी असं वाटेल. पण ही माशी नसून ती ‘बग’ किंवा ‘ढेकणे’ च्या कुळातला किडा आहे. इंग्रजीमध्ये तिला ‘लॅंटर्न फ्लाय’ असं म्हणतात. नावावरुन ती माशी असल्याचा भास होतो पण ती दिसते मात्र फुलपाखरासारखी किंवा पतंगासारखी.
सोनावणे चाळ ते इंग्लंड व्हाया व्हीलचेअर!

Diksha Dinde : दीक्षाच्या आईने एकहाती तिची सगळी जबाबदारी पेलली अगदी शाळेत उचलून नेण्यापासून ते तिला आत्मविश्वास देईपर्यत. या लेकीनंही आई वडिलांच्या विश्वासाचं सोनं केलं आज त्यांची लेक संयुक्त राष्ट्रसंघाचा ग्लोबल यूथ एज्युकेशन अम्बॅसेडर म्हणून निवड झालेली, महाराष्ट्र राज्याचा आणि भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळवलेली आणि ब्रिटन सरकारची प्रतिष्ठेची चिवनिंग स्कॉलरशिप कमावलेली मुलगी आहे. तिचं नाव आहे- दीक्षा दिंडे.
व्हिसाची तयारी

Visa : अमेरिकन व्हिसा हे नाव उच्चारले की, बरेचसे समज-गैरसमज ऐकायला मिळतात. अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, हे पाहुयात. अमेरिकन व्हिसासाठी दोन बाबींची पूर्तता करावी लागते. एक म्हणजे आर्थिक कागदपत्रे आणि दुसरे म्हणजे व्हिसासाठीची मुलाखत.
अँटी व्हायरस सोल्युशन्सचा बादशाह- कैलास काटकर

Kailas katkar :कंप्युटर्ससाठी अँटी व्हायरस सिस्टीमही अत्यावश्यक बनली आहे. आणि अँटी व्हायरस सिस्टीममध्ये सगळ्यांत अग्रेसर नाव आहे क्विकहिल (Quick heal). महत्वाचं म्हणजे या अग्रगण्य कंपनीचे संस्थापक मालक आहेत कैलास काटकर
माती – भाग २

Soil : निसर्गात सुपीक माती नक्की कशी तयार होते, हे समजून घेण्यासाठी एक महत्वाची संकल्पना लक्षात घेणं गरजेचं आहे ती म्हणजे Ecological Succession (परितंत्रीय अनुक्रमण). म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेपासून जंगल तयार होण्याची प्रक्रिया.
आदर्श ग्राम : संकल्पना व वास्तव

Adarsh Gram Schemes : प्रेरणादायी, दिशादर्शक कृती इतरांनी अनुकरण करावे अशी कृती म्हणजे आदर्श कृती. असे करणारी व्यक्ती म्हणजे आदर्श व्यक्ती. एकमेकांच्या अनुभवातून, सामूहिक शिक्षणातून लोकशिक्षणाचा नवा आयाम तयार होतो, म्हणून अशा कृतीला आदर्श म्हणतात. गाव खेड्यांमध्ये नवनवीन प्रयत्न लोकं करत असतात. सामुहिक प्रयत्नांना यश येते, पुढे जाऊन याची योजना बनते. अशाच आदर्श ग्राम योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.