FASTag वार्षिक पास: आता फक्त 3000 हजार मध्ये, वर्षभर टोलची चिंता मिटवा!

FASTag Annual Pass: येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून आपल्याला एक नवीन FASTag-आधारित वार्षिक पास मिळणार आहे. यामुळे तुम्हाला आता टोल नाक्यांवर जास्त वेळ थांबावं लागणार नाही. तसंच टोल नाक्यांवर गाड्यांची गर्दी कमी होईल आणि प्रवासात होणारे वादही थांबतील. आणि तुमचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होईल.

इराण – इस्रायल संघर्ष : भारतीय नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश

Iran – Israel War : इराण आणि इस्रायल दरम्यान संघर्ष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दोन्ही देशांतील भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. दोन्ही देशांमध्ये दररोज होणाऱ्या हवाई हल्ल्यामुळे भारतीय नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. हल्ले होत असलेल्या ठिकाणच्या भारतीय नागरिकांना, विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. 

जी – 7 परिषदेत भारताला कॅनडाकडून खास आमंत्रण

G – 7 Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 16 – 17 जून 2025 रोजी होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने कॅनडा दौऱ्यावर आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान मोदी यांना विशेष आमंत्रण दिलं आहे. भारत हा जी – 7 संघटनेचा सदस्य देश नाही. तरिही, 2019 पासून सलग सातव्यांदा भारत या शिखर परिषदेत सहभागी होत आहे. त्यामुळे ही घटना भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

सिंधू नदीच्या पाण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन!

Indus River water : भारत सरकारने आता सिंधू नदीच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या देशासाठी, आपल्या शेतीसाठी आणि विकासासाठी करण्याचा एक खास ‘मास्टरप्लॅन’ तयार केला आहे. याचा थेट फायदा जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि विशेषतः राजस्थानला होणार आहे.

‘जनगणना 2027’ ची अधिसूचना जारी

Census 2027 : केंद्र सरकारने दिनांक 16 जून 2025 रोजी ‘जनगणना 2027’ ची अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार देशभरात दोन टप्प्यामध्ये जनगणना केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

नोकरदार व्यक्ती ‘कर कपात’ पद्धत कशी निवडू शकतो?

ITR Filing Forms : केंद्र सरकारने 2024 सालच्या अर्थसंकल्पामध्ये कर कपातीमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे सामान्य करदात्यांपुढे जुनी आणि नवीन कर पद्धतीचा पर्याय खुला आहे. याशिवाय आयटीआर फॉर्म 1 मध्येही बदल केल्यामुळे आता कोण – कोणते करदाते आयटीआर फॉर्म 1 चा उपयोग करु शकतात हे आपण जाणून घेणार आहोत.

तुमचा एसी 20°C च्या खाली जाणार नाही! 

AC limits: भारत सरकारने एअर कंडिशनरसाठी तापमान मर्यादा 20°C ते 28°C दरम्यान निश्चित केली आहे. म्हणजेच, 20°C हून कमी किंवा 28°C पेक्षा जास्त तापमानावर एसी चालवता येणार नाही. हे नियम नवीन एसी मॉडेल्ससाठी लागू होतील. यामुळे ऊर्जा बचत होईल आणि पर्यावरणावर होणारा ताण कमी होईल.

‘रक्तदान श्रेष्ठदान’

World Blood Donor Day : ‘रक्तदान श्रेष्ठदान’,‘रक्तदानाने आपण अनेकांना जीवदान देत असतो’ असे अनेक घोषवाक्य आपण ऐकत असतो.. या माध्यमातून अनेकांनी रक्तदान करावं हेच अपेक्षित असते. सुदृढ व्यक्तीला दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येते. आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. मात्र, रक्तदान करताना आणि रक्तपेढीतून रक्त विकत घेण्यासंबंधित अनेक नियम आहेत. आंतरराष्ट्रीय रक्तदाना दिनानिमित्ताने याविषयाची आपण माहिती घेणार आहोत.

जम्मू-काश्मीरमध्ये जास्त पाणी साठवून वीज निर्मिती करण्यात येणार!

Indus Waters Treaty: जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या नव्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये आपण जास्त पाणी साठवून जास्त वीज तयार करणार आहोत. भारताच्या केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

तुमच्या इकोफ्रेण्डली किचनकरता भाताच्या तूसापासून बनवलेली भांडी!

Rice Husk Kitchenware : पर्यावरणाला पूरक अशा कृषी उत्पादनापासून भांडी वा अन्य वस्तू निर्माण करुन त्याचा वापर करण्यावर भर देत आहेत. यामध्ये बांबूपासून बनवलेली भांडी, शोभेच्या वस्तू, फर्निचर यांचा समावेश आहे. कागदापासून बनवलेले तात्पुरत्या वापरायच्या बश्या, वापरलेल्या ऊसाच्या कचऱ्यापासून आणि गव्हाच्या पेंढ्यापासून बनवलेल्या वस्तूही आता वापरात आहेत. यासोबतच आता भाताच्या तूसापासून बनवलेल्या वस्तूंची निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे.

महिला, ग्रामीण भारत आणि मोदी सरकार

government schemes : गेल्या 11 वर्षांपासून देशात मोदी सरकार सत्तेत आहे. या काळात त्यांनी ग्रामीण भागासाठी आणि विशेषतः महिलांसाठी खूप योजना आणल्या. यातल्या काही योजना तर इतक्या प्रभावी ठरल्या की त्यामुळे लाखो लोकांचं आयुष्यच बदलून गेलं.

वानर आणि रानडुक्करांचा ‘दर्जा’ बदलण्याची केरळ सरकारची मागणी!

Kerala : केरळमधले जवळपास 941 गावं आहेत, त्यापैकी 273 गावांमध्ये जंगली प्राण्यांचा त्रास खूप वाढला आहे. हे प्राणी म्हणजे कोण? वाघ, बिबट्या, हत्ती, गवा, रानडुक्कर, माकडं, मोर इत्यादी. बिबट्या किंवा वाघ हे प्राणी तर माणसांवर हल्ला करतातच. पण माकडं आणि मोर माणसाला मारत नाहीत, पण ते शेतात येऊन इतकं नुकसान करत आहेत की, शेतकरी वैतागून शेतीच सोडून देत आहेत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ