15 जून पूर्वीच आयटीआर भरण्याची घाई करु नका!

Finance : आर्थिक वर्ष 2024 – 2025 चा इन्कम टॅक्स भरण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म्स इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहे. तरिही, 15 जून पूर्वी इन्कम टॅक्स न भरण्याचा सल्ला अर्थ विषयातले तज्ज्ञ देत असतात. असं का हे आपण या लेखात समजून घेऊ.
पेन्टेकॉस्ट : पवित्र आत्म्याचा सण

Pentecost Feast : ईस्टरच्या दिवसापासून पुढच्या 40 दिवसानंतर येशू स्वर्गात गेला. त्यापुढच्या काळात ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा प्रचार-प्रसार शिष्यांना करता यावा, त्यांना वेगवेगळ्या भाषा समजाव्यात, त्यांना शक्ती मिळावी, त्यांना योग्य मार्गदर्शन करावं म्हणून येशू ख्रिस्ताने शिष्यांना पवित्र आत्मा दिला. त्याच पन्नासाव्या दिवसाला ‘पेन्टेकॉस्ट’ म्हटलं जातं. हा दिवस पवित्र आत्माचा सण म्हणून साजरा केला जातो.
बोका शौल – अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असलेला तांदूळ, जो न शिजवता खाल्ला जातो!

Boka Saul Rice : आज आपण अश्या एका तांदळा बद्दल जाणून घेणार आहोत. जो न शिजवता खाता येतो आणि तितकाच तो चविष्ट लागतो. त्याचबरोबर या भातामधून प्रोटीनही जास्त मिळत. आता प्रोटीन म्हटलं की आपल्याला डाळी, कडधान्य, अंडी आणि चिकन आठवतं. पण या भातामध्ये अंड्यांपेक्षा जास्त प्रोटीन मिळतात. या भाताची लागवड करून शेतकरी त्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकतात. या तांदळाचे नाव ‘बोका शौल’ (Boka Saul Rice) आहे. आसाममध्ये या भाताचे पिक सर्वाधिक घेतलं जाते.
कॉफी बागांमुळे पर्यावरण संवर्धनास मदत! कर्नाटकच्या एनसीएफचा विशेष उपक्रम

Environmental Day : पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे गेल्या काही वर्षापासून संपूर्ण जगाला हवामान बदलाचा फटका बसत आहे. याचा परिणाम माणसाच्या आरोग्यापासून, उद्योगापर्यंत अशा प्रत्येक क्षेत्रावर होत आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाला याचा दुष्परिणाम सहन करावा लागत आहे. अशावेळी जंगल पुन्हा नव्याने प्रस्थापित करणं हा एक उत्तम उपाय आहे. पण ते साधायचं कसं? याचं उत्तर ही कर्नाटकमधल्या नेचर कन्झर्वेशन फाउंडेशनने शोधलं आहे. पाहुयात जंगलाचं पुनर्वसन कसं करता येईल.
छत्तीसगडमधलं केरलापांडा गाव झालं नक्षलमुक्त!

Naxal Free India : छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यातल्या 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. यातले 9 नक्षलवादी हे सुकमा जिल्ह्यातले केरलापांडा ग्रामपंचायत गावातले होते. या नऊही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे केरलापांडा गाव हे नक्षलमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
आता आधार कार्ड नेहमी सोबत फिरवण्याची गरज नाही!

Aadhaar card:केंद्र सरकारकडून ‘Aadhaar App’ लाँच करण्यात आले आहे. हे ॲप वापरण्यास खूप सोपे आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन ॲप बद्दल माहिती दिली.
कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर आढळले सूक्ष्म प्लास्टिकचे कण! केरळ जहाज दुर्घटनेचा परिणाम

Micro Plastic At Kanyakumari : हायड्रोकार्बन प्रकल्पामुळे कन्याकुमारी समुद्र किनाऱ्यावरील अधिवास संपुष्टात येईल अशी चिंता स्थानिक मच्छिमारांनी आणि पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. या चिंतेत आणखीन भर टाकली आहे ती केरळ इथे झालेल्या जहाज दुर्घटनेने. या दुर्घटनेमुळे कन्याकुमारी समुद्रकिनाऱ्यावर सूक्ष्म प्लास्टिकचे कण आढळले आहेत.
ॲनल फिस्टुलावर ‘क्षारसूत्र’ आयुर्वेदिक उपचार पद्धत

Fistula : बदलत्या जीवनशैलीसोबत आजारांची व्याप्तीही मोठ्या प्रमाणावर बदलत चालली आहे. बरेच आजार हे आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, ताण-तणाव, बैठी कामं यामुळे होत असल्याचं आढळून येत आहे. रक्तदाब, मधुमेह, कंबरदुखी असे काही आजार असतील तर एकवेळ इतरांना सांगता तरी येतं पण काही आजारांबद्दल जाहीर वाच्यता ही कोणाजवळ करता येत नाही. काही आजार हे माणसाला मानसिक, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मारत असतात, असाच एक आजार आहे ॲनल फिस्टुला.
आयटीआर भरायचा आहे.. पण फॉर्म 16 घेतला का?

Finance: फॉर्म 16 यालाच टीडीएस म्हणजे ( Tax Deducted at source ) असं म्हटलं जातं. या टीडीएस सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला मिळणारा वार्षिक पगार, कर कपातीसाठी निवडलेली करपद्धत कर्मचाऱ्याने पगाराच्या उत्पन्नातून दावा केलेल्या वजावटीची आणि सूट याची माहिती दिलेली असते. त्यामुळे इन्कम टॅक्स भरताना हे प्रमाणपत्र अत्यावश्यक असते.
मेक इन इंडिया धोरण हा ऑपरेशन सिंदूर मधला मुख्य घटक – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन

Make In India : ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी मौल्यवान धोरण आहे. आणि हे धोरण ‘ऑपरेशन सिंदूर’ मधलं मुख्य घटक ठरला आहे, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेमध्ये केलं आहे.
मधमाश्या भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय!

Rent-a-Bee-Business : कृषी क्षेत्रामध्ये ‘मधमाश्या भाडेतत्वावर देणे’ हा व्यवसाय तेजीत आला आहे. शेती क्षेत्रासाठी, पिकांच्या वाढीसाठी मधमाश्या या अतिशय उपयुक्त कीटक आहेत.
SMS कोड आणि TRAI चे नवीन नियम तुम्हाला माहितेय का ?

TRAI’s new rules : फेक कॉल्स आणि मेसेजेसना आळा घालण्यासाठी आणि तुमच्या मोबाईलवर येणारे मेसेज अधिक सुरक्षित करण्यासाठी, TRAI कडून महत्त्वाचे नियम जाहीर करण्यात आले आहेत.