भारतानं केली पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांची कोंडी

Pahalgam terror attack: पहलगाम हे जम्मू-काश्मीरमधलं महत्त्वाचं पर्यटन स्थळं आहे. अशा पर्यटनस्थळी दिवसा-ढवळ्या झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरुन गेलं आहे. या हल्ल्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने चीनच्या सहकार्याने सुरू केलेली धोरणात्मक गुंतवणुकीवर सगळ्यांच्या नजरा रोखल्या गेल्या आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये चायना-पाकिस्तान इकॉनॉमीक कॉरिडोर (CPEC) आणि चायना बेल्ट अँड रोड इनिशिअटिव्ह (BRI) या प्रकल्पांच्या कामाची गती आता मंदावणार आहे.
सोनू कंवर यांची बालविवाहाविरुद्धची लढाई

Sonu Kanwar : राजस्थानमधील बालविवाहाच्या जुन्या सामाजिक परंपरेला आव्हान देण्यासाठी 28 वर्षीय सोनू कंवर यांनी आतापर्यंत तब्बल 12 बालविवाह यशस्वीरित्या थांबवले आहेत. केवळ इतकेच नव्हे, तर जनजागृती आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी भविष्यात होणारे शेकडो बालविवाह रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वाढत्या वृद्ध लोकसंख्येमुळे वृद्धांची आरोग्य जपणे ही प्राथमिकता

जागतिक पातळीवर 2050 पर्यंत वृद्ध माणसांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच शून्य ते 15 वयोगटातील मुलांपेक्षा वृद्धांची संख्या जास्त असणार आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने 2021 ते 2030 हे दशक निरोगी वृद्धत्वाचे दशक म्हणून घोषित केलं आहे
परग्रहावरील जीव शोधणारे शास्त्रज्ञ भारतीय वंशांचे निक्कू मधुसूदन

Dr. Nikku Madhusudhan : भारतीय वंशाचे खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. निक्कू मधुसूदन यांच्या नेतृत्वाखालील संशोधक टीमने परग्रहावर सजीव वस्ती असल्याचे संकेत मिळाल्याचा दावा केला आहे. ही सजीव वस्ती आपल्या सौरमाला कक्षेतल्या ग्रहावर नसून पृथ्वीपासून सुमारे 120 प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या K2-18b नावाच्या ग्रहावर आहे.
भारतात आणले जाणार आणखी 8 चित्ते! गांधी सागर अभयारण्यात होणार पुनर्वसन

Project Cheetah : ‘चित्ता प्रकल्पा’ अंतर्गत दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना इथून 8 चित्यांना भारतात आणले जाणार आहे. त्यांना दोन टप्प्यात भारतात आणले जाईल. यापैकी 4 चित्ते मे महिन्यापर्यंत भारतात येतील.
‘भाषा म्हणजे धर्म नाही’ नामफलकावर उर्दू भाषेच्या वापरावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

अकोला जिल्ह्यातल्या पातूर नगरपरिषद इमारतीवरील नामफलकावर फक्त मराठीच भाषा असायला हवी, उर्दू भाषा नसावी अशी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती. यासंदर्भात निकाल देताना सुप्रीम कोर्टाने भाषा ही संवादासाठी असून कोणतीच भाषा ही जगातल्या कोणत्याच धर्माचं प्रतिनिधीत्व करत नसल्याचं स्पष्ट करत ही याचिका फेटाळून लावली.
भगवत गीता आणि नाट्यशास्त्र युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ च्या यादीत!

Bhagavad Gita and Natya Shastra: भगवत गीता आणि भरतमुनींचे नाट्यशास्त्र या दोन ऐतिहासिक ग्रंथांचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय जागतिक वारसा दिनानिमित्त जाहीर करण्यात आला.
सोने तारण कर्जासंबंधित आरबीआयचे नवे धोरण

आरबीआयच्या या नवीन प्रस्तावित मसुद्यामध्ये तारण म्हणून ठेवल्या जाणाऱ्या सोन्याच्या मूल्यांकनानुसार किती कर्ज द्यायचं याचीही मर्यादा ठरवून दिली आहे. तसंच सोने तारण वर दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा 75 टक्क्याहून जास्त नसावी हे स्पष्ट केलं आहे. जर सोने तारणची किंमत ही 10 हजार रुपये असेल तर त्यावर 7,500 रुपयेच कर्ज द्यावं. ही अट सर्व बिगर बँक वित्तीय संस्थाना लागू होणार आहे.
आयआयटी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बनवली मोफत वेबसाईट – संस्कृत शिकणं झालं सोपं!

learning Sanskrit : या वेबसाईटवर संस्कृत साहित्य विविध भागांमध्ये विभागलेले आहे. उदाहरणार्थ, धडे, कविता, श्लोक असे वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक भागात त्या त्या मजकुरासोबत त्याचा अर्थ, भाषांतर, आणि त्या शब्दांची रचना कशी झाली आहे हे सर्व काही समजावून सांगितलं आहे.
भावना इस्वीची संगीत आणि आर्किटेक्चर क्षेत्रातील यशस्वी वाटचाल

Bhavana Isvi :भावनाला लहानपणापासूनच गाण्याची खूप आवड होती. आर्किटेक्चरचा अभ्यास करत असतानाही तिने आपली गाण्याची आवड जपली. शिक्षण आणि करिअरच्या गडबडीत तिने गाण्याचा सराव थांबवला नाही. तिच्या या सातत्यामुळेच तिला मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायनाची संधी मिळाली.
शेतकचरा जाळण्याच्या घटनेला सरकारी धोरण कारणीभूत! अभ्यासाअंती संशोधकांचा दावा

Stubble Burning : ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातल्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते. मात्र शेतकरी हा कचरा का जाळतात? हा कचरा न जाळता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट कशी लावता येईल? आणि शेतकऱ्यांच्या या कृत्याला सरकारी धोरणं कशाप्रकारे जबाबदार आहेत याविषयी आयएमएम संस्थेतील अभ्यासकांनी विशेष संशोधन केलं आहे.
रविवारची सुट्टी: एका मराठी कामगार नेत्यानं मिळवून दिलेला ‘आरामाचा हक्क’!

Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि मजुरांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवला. हा संघर्ष तब्बल सहा वर्षे चालला. अखेर लोखंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले. इंग्रज सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली आणि 10 जून 1890 रोजी भारतात रविवारीची साप्ताहिक सुट्टी अधिकृतपणे लागू झाली.