पासपोर्टमध्ये आता जोडीदाराचे नाव टाकण्यासाठी ‘Annexure J’ फॉर्म पुरेसा!

Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव जोडायचं असेल तर त्यासाठी आता मॅरेज सर्टिफिकेट द्यायची गरज भासणार नाही.

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस

दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. आपल्या देशातील महिलांना गर्भधारणा, बाळंतपण आणि प्रसूतीकाळानंतर येणाऱ्या धोक्यांबद्दल माहिती करून देण्याकरता हा दिवस पाळण्यात येतो. पण याचा अर्थ असा नाही की, महिलांमध्ये गरोदरपणा आणि बाळंतपणाबद्दल भीती निर्माण करणे. तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसानिमित्तानं सुरक्षित गर्भारपण आणि बाळंतपण याबद्दल माहिती दिली जाते. ‘माता मृत्यू रोखणे’ हे या दिवसाचे प्रमुख ध्येय आहे.

तुम्हांला भारतीय पासपोर्टच्या पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगांचा अर्थ माहीत आहे का?

Indian Passport :परदेशात असताना आपण मूळ कोणत्या देशाचे नागरिक आहोत याची ओळख पासपोर्टद्वारे होते. देशाबाहेर आपलं ओळखपत्र म्हणून पासपोर्टचा वापर होतो. भारतात वेगवेगळ्या प्रकारचे पासपोर्ट आहेत. आणि त्यांना ओळखण्यासाठी विशिष्ट रंग देण्यात आला आहे.

आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी डॉ. पूनम गुप्ता यांची नियुक्ती

RBI Deputy Governor : रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर डॉ. पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2025 पासून पुनम गुप्ता यांनी कार्यभार हाती घेतला आहे. त्यांची नियुक्ती ही पुढच्या तीन वर्षासाठी राहणार आहे. यापूर्वी त्या नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाईड इकोनॉमिक्स रिसर्च संस्थेच्या महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. 

केरळच्या 59 वर्षीय महिलेनं कुठलेही प्रशिक्षण न घेता केला एव्हरेस्ट बेस कॅम्प सर 

Kerala climbs Everest Base Camp : केरळमध्ये राहणाऱ्या वासंती चेरुवित्तील यांनी वयाचं बंधन तोडून एकटीने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत चढाई केली. विशेष गोष्ट म्हणजे, त्यांनी हे कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय केलं. फक्त YouTube व्हिडिओ पाहून त्यांनी स्वतःला प्रशिक्षण दिलं आणि  हा अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला.

सीबीएसई पालकांसाठी घेणार विशेष कार्यशाळा

CBSE Parenting workshop : पाल्यांचा आणि पालकांचा नियमित संवाद व्हावा, त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण, सामंजस्याचं नातं निर्माण व्हायला हवं यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी सीबीएसईने पाऊल उचललं आहे. नवीन शैक्षणिक धोरणातंर्गत सीबीएसई बोर्डाने ‘पॅरेंटिंग प्रोग्राम’ या उपक्रमाला सुरुवात करणार आहे.

परदेशात राहणाऱ्या भारतीयांना घरबसल्या मतदानाचा हक्क मिळणार का?

right to vote remotely : परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना (NRI) आता घरबसल्या मतदान करण्याचा हक्क मिळणार का? याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सध्या, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना मतदान करण्यासाठी भारतात येऊनच मतदान केंद्रावर जावे लागते. पण, आता एक संसदीय समिती परदेशी भारतीयांना घरबसल्या मतदान करण्यासाठी पाठिंबा देत आहे.

हॉटेलमध्ये सर्व्हिस टॅक्स भरायचा की नाही? दिल्ली हायकोर्टाने काय निर्णय दिला?

Service Tax : तुम्ही हॉटेलला जेवायला गेला असाल आणि तुमच्या बिलामध्ये सर्व्हिस टॅक्स म्हणून काही रक्कम आकारली असेल तर नम्रपणे ती रक्कम भरण्यास स्पष्ट नकार द्या. कारण दिल्ली हायकोर्टाने ग्राहकांना हा सर्व्हिस टॅक्स भरणं बंधनकारक नसल्याचं म्हटलं आहे. 

भारतातल्या नवीन वर्षांमधील विविधता आणि वेगळेपणा

New Year : निसर्गपूजेला आपल्या देशात खूप महत्त्व आहे. रब्बीचा हंगाम संपून पीक हातात आलेलं असतं. एक ऋतूचक्रही संपलेलं असतं. ऋतूबदलानेच नविन वर्षाची सुरूवात होते.

‘स्तन दाबणे आणि पायजमा उतरवणे म्हणजे बलात्कार नाही’ अलाहाबाद कोर्टाच्या या निकालावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Allahabad High Court : ‘स्तन पकडणे, पायजम्याची नाडी सोडणे म्हणजे बलात्कार किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असा होत नाही; तर ही गंभीर लैगिंक अत्याचाराची कृती आहे’ या अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर सुप्रीम कोर्टाने बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी स्थगिती दिली आहे.

पॅरा आर्चरी स्टार पायल नाग

Archery Payal Nag : वयाच्या पाचव्या वर्षी पायलने विजेचा धक्का लागल्यामुळे दोन्ही हात आणि पाय गमावले. या अपघातातून बचावलेल्या या पाच वर्षाच्या मुलीनं हार मानली नाही. दोन्ही हात पाय नसतानाही ती आर्चरी सारखा खेळ शिकली आणि आज राष्ट्रीय पातळीवर गोल्डन आणि सिल्वर पदक मिळवलं.  इथवरच न थांबता आता जागतिक पातळीवर देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहतेय. 

भारताचा चीनवर अँटी-डम्पिंग कराचा दणका!

anti-dumping duty : चीनमधून येणाऱ्या स्वस्त आयातीपासून भारतीय उत्पादकांना वाचवण्यासाठी भारताने मोठं पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने चीनमधून येणाऱ्या सॉफ्ट फेराइट कोर, व्हॅक्यूम इन्सुलेटेड फ्लास्क, ॲल्युमिनियम फॉइल, ट्रायक्लोरो आइसोसायन्यूरिक अ‍ॅसिड आणि पॉली विनाइल क्लोराईड पेस्ट रेझिन या वस्तूंवर अँटी-डम्पिंग कर लावण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ