महाराष्ट्रात कुठे होणार मॉक ड्रील?

Mock drill : देशभरात बुधवार, 7 मे रोजी मॉक ड्रील घेण्यात येणार असल्याचं सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड डायरेक्टरेटतर्फे सोमवारी सांगण्यात आलं. 1971 च्या बांग्लादेश मुक्ती युद्धानंतर पहिल्यांदाच देशात अशी मॉक ड्रील घेण्यात येत आहे. भारतात 244 जिल्ह्यांमध्ये ही मॉक ड्रील होणार आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडे 2025 मध्ये ‘घरगुती हिंसाचार आणि हल्ला’ या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद!

Violence Against Women : राष्ट्रीय महिला आयोगाने 2025 वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आहे. यामध्ये हुंड्यासाठी छळाच्या 916 तक्रारींसह, बलात्कार व बलात्काराचा प्रयत्न 394 तक्रारी आणि महिलांच्या विनयभंगाच्या 310 तक्रारीं नोंदवल्या आहेत.

चार धाम यात्रा नेमकी काय आहे?

चार धाम यात्रा: आयुष्यात एकदा तरी चार धाम यात्रा करावी, अशी हिंदू धर्मियांची इच्छा असते. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ (शंकर) आणि बद्रीनाथ (विष्णू) या मंदिरांना चार धाम म्हणतात. खडतर हवामान आणि मार्गामुळे काही मर्यादीत काळातच या ठिकाणी जाता येतं. चार धाम यात्रेला सुरूवात झाली आहे त्यानिमित्तानं या स्थळांचं धार्मिक महत्व आणि तिथं कसं जायचं जाणून घेऊयात.

जागतिक पातळीवरील धुमश्चक्रीत भारताच्या उत्पादनात आणि निर्यातीत वाढ!

India’s manufacturing sector : अमेरिकेकडून सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवरही भारताने उत्पादन क्षेत्रामध्ये गेल्या 10 महिन्यातला उच्चांक गाठला आहे. तसंच निर्यात क्षेत्राचंही प्रमाण चांगल्यारीतीने वाढल्याचं पाहायला मिळतं.

96 वर्षीय कठपुतळी कलाकार भीमव्वा शिल्लेक्यतारा

Padmashri Awardee : कठपुतळी या कलाक्षेत्रातील योगदाना बद्दल 96 वर्षीय भीमव्वा शिल्लेक्यतारा यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी त्यांना पुरस्कार देण्यात आला.

पूर्णपणे नैसर्गिक शेती करणारं भारतातील सिक्किम राज्य

Sikkim world’s first organic state : सिक्किममधील जवळपास 66,000 शेतजमिनी पूर्णपणे सेंद्रिय आहेत. इथे कोणतीही रासायनिक खते किंवा कृत्रिम कीटकनाशके वापरली जात नाहीत. सिक्किम सरकारने सर्व प्रकारच्या रसायनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. आणि त्यामुळेच आज सिक्किमला ‘जगातील पहिले संपूर्ण सेंद्रिय राज्य’ म्हणून ओळखण्यात येते.

एआयमुळे अनेक नोकऱ्यांवर गदा येणार हे वास्तव!

AI Technology : सुरुवातीला एआय तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याचं वक्तव्य केलं जायचं. याला छेद देत एआय तंत्रज्ञानामुळे आपलं काम किती व्यवस्थितरीत्या, कमी वेळेत आणि उत्तम गुणवत्तेने करु शकतो हे सगळ्यांनी पटवून घेतलं. आणि कार्यालयातल्या नेहमीच्या कामामध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढू लागला.  तंत्रज्ञान, जाहिरात, माध्यम, कला ते आरोग्य, कृषी अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा शिरकाव झालेला आहे. आणि आता खरंच एआयमुळे नोकऱ्यांवर गदा येत आहे हे वास्तव दिसू लागलं आहे. 

मरीन राफेल करार : भारताचा सर्वात मोठा संरक्षण करार!

Marine Rafale deal : सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी भारत आणि फ्रान्स दरम्यान मरीन लढाऊ विमाने खरेदीचा 63,887 कोटी रुपयाचा (Euro 6.6 billion) करार झाला. ही लढाऊ विमाने आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर तैनात करण्यात येणार आहेत.

शिमला करार पाकिस्तानकडून स्थगित; भारतासाठी तीन मोठे फायदे!

Shimla Agreement : पाकिस्तानने स्वतःहून शिमला करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने दहशतवाद्यांविरुद्ध कडक पावले उचलल्यामुळे आणि सिंधू जल कराराबाबत कठोर भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तान दबावात आला होता. यामुळे त्यांनी शिमला करार तात्पुरता स्थगित करण्याची घोषणा केली.

आता लहान मुलंही उघडू शकतील स्वतःचं बँक खाते; RBI चे नवे नियम जाहीर

RBI Rules : पैशांची बचत, त्याचे योग्य नियोजन आणि त्यातून होणारे फायदे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. हेच लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने लहान मुलांसाठी बँक खाती उघडण्यासंबंधी काही नवीन नियम जाहीर केले आहेत.

भारताचा पाकिस्तानवर आर्थिक हल्ला!

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबतचा व्यापार पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.  23 एप्रिल 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती, पाकिस्तानवर राजनैतिक दबाव, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सवलती स्थगित करणे, पाकिस्तानी लष्करी कर्मचाऱ्यांना देश सोडण्याचे निर्देश देणे यासारखे निर्णय घेत भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे.

कीर्तिगा रेड्डी यांनी सुरू केलं ‘एआय किरण’ – भारतीय महिलांसाठी एक अनोखा प्लॅटफॉर्म

AI Kiran : ‘एआय किरण’ या प्लॅटफॉर्मचा उद्देश भारतीय महिलांना एआय क्षेत्रात अधिक सक्षम बनवणे आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना एआय विषयी शिकवले जाईल. त्यांना या क्षेत्रात करियर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि मदत या प्लॅटफॉर्मद्वारे मिळेल.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ