पाकिस्तानसोबत सीझफायरचा निर्णय का आणि कसा घेतला गेला?

India Pakistan : पाकिस्तान बरोबर सीझफायर नक्की का केला गेला याच्या उलटसुलट चर्चा आपल्या देशात सुरू आहेत. लोकशाही देशात अशा चर्चा व्हायला देखील हव्यात. सीझफायर करण्याचा निर्णय कसा घेतला गेला हे जनतेला जाणून घेण्याचा अधिकार आहे.
माता मृत्यूदराचं प्रमाण घटलं! मातामृत्यू टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी

Maternal Mortality Ratio : भारतामध्ये माता मृत्यूदर प्रमाण घटत आहे, ही एक सकारात्मक गोष्ट सध्या होताना दिसतेय. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 2019 ते 2021 या 2 वर्षात माता मृत्यूदराचे प्रमाण 1 लाखामागे 93 असं राहिलेलं आहे. 2018-20 या कालावधीत हे प्रमाण 97 असं होतं. तर 2017-2019 या वर्षात प्रति 1 लाखामागे 103 महिलांचा बाळाला जन्म देताच मृत्यू होत असे.
भारत – पाकिस्तान दरम्यान हल्ले थांबवण्याचा निर्णय

India Pakistan : भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी 10 मे 2025 रोजी पत्रकार परिषद घेत भारत – पाकिस्तान दरम्यान हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. दोन्ही देशादरम्यान सुरू असलेले हल्ले पूर्ण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं पालन दोन्ही देशातील तिन्ही दलांकडून केलं जाईल. तसंच 12 मे 2025 रोजी दोन्ही डिजिएमओ दरम्यान चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
युद्ध आणि शेअर मार्केट

War and share Market : कोणत्याही देशातील दीर्घकाळ चाललेल्या सर्वकष युद्धाची सर्वात जास्त झळ त्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्यांना, संरक्षण दलातील लोकांना, त्यांच्या कुटुंबीयांना, सीमेलगतच्या गावांना / शहरांना, ज्याठिकाणी शत्रूचे बॉम्ब आणि मिसाईल पडतात तेथील लोकांना बसत असते. ज्याची रुपयातील किंमत कधीच काढता येणार नाही. त्याच बरोबर त्या देशाच्या स्थूल / मॅक्रो अर्थव्यवस्थेवर गंभीर आघात होतो. देशाची जीडीपी, व्याजदर, महागाई, परकीयचलन साठे अशा अनेक गोष्टींवर परिणाम होतो.
S-400 आणि सुदर्शन चक्र नेमकं आहे तरी काय?

India Pakistan : भारताने इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड आणि रशियानिर्मित एस-400 सुदर्शनचक्र या हवाई संरक्षण प्रणालींद्वारे पाकिस्तानने केलेले सर्व हल्ले परतवून लावले. पाहुयात हे सुदर्शनचक्र आणि इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड नेमकं काय आहे.
जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील 11 ठिकाणी पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी

India Pakistan: गुरुवारी 8 मे रात्री जम्मू, पठाणकोट, पूँछ, राजौरी, उधमपूरसह 11 ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन, फायटर जेट आणि मिसाईलने हल्ला केला. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं या सर्व हल्ल्यांना यशस्वीपणे परतवून लावलं. तर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अशा प्रकारे हल्ला केल्याचा नाकारलं आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला प्रत्यूत्तर देण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांचा जीव वाचवणं ही भारतीय सैन्याची प्राथमिकता

India – Pakistan : पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यावर त्यांना प्रत्यूत्तर देण्यापूर्वी तिथल्या स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळावर हलवणं आणि त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं ही भारतीय सैन्यांची प्राथमिकता असते, असं प्रफुल्ल सारडा यांनी ‘श्रेष्ठ महाराष्ट्राशी’ बोलताना सांगितलं.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने कोणती शस्त्रास्त्रे वापरली? नागपूरशी आहे थेट कनेक्शन

Operation Sindoor : भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सामान्य नागरिकांचं नुकसान होऊ नये, म्हणून दहशतवादी कॅम्पवर अचूक हल्ला करण्यासाठी लोटेरिंग म्यूनिशन्सचा वापर केला होता. ही शस्त्रास्त्रे भारतीय बनावटीचे असून याचा नागपूरशी थेट संबंध आहे.
ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या महिला अधिकारी

पहलगामच्या हल्ल्यात महिलांना वगळून पुरुषांना टार्गेट करण्यात आलं. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ करणं आणि लष्करातील महिला अधिकाऱ्यांनी प्रेस ब्रीफ देणं हा एक स्ट्रॅटेजिक निर्णय आहे. या आधी कोणत्याही ऑपरेशननंतर महिला अधिकाऱ्यांनी प्रेस ब्रीफ दिलं नव्हतं. जाणून घेऊयात या दोन महिला अधिकारी कोण आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ नावामागची भारताची स्ट्रॅटेजी

Operation Sindoor : 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 7 मे 2025 च्या पहाटे 1 ते 1.30 च्या दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी कॅम्पवर क्षेपणास्त्र (मिसाईल) हल्ला केला. भारताच्या या मिशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं. लष्करातील दोन महिला अधिकाऱ्यांनी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती पत्रकार परिषदेत दिली. जाणून घेऊयात भारताच्या या मिशनचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं का ठेवलं?
ऑपरेशन सिंदूर-भारताचा पीओकेवर क्षेपणास्त्र हल्ला

India Pakistan: 22 एप्रिल 2025 ला पहलगामला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 25 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. बुधवारी 7 मे 2025 चा भारताने पीओकेवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला या अतिरेकी हल्ल्याला पहिलं चोख प्रत्युत्तर मानलं जात आहे.
भारताचं ‘पाणी अडवा, पाकिस्तानची जिरवा’ धोरण

India – Pakistan : भारताने सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देऊन पाकिस्तानचं पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पाकिस्तानला अल्पकाळातच त्याचे परिणाम भोगावे लागले. पण पाणी अडवण्याच्या निर्णयानंतर भारताकडे या सहाही नद्यांचं पाणी साठवण्याची क्षमता आहे का? या नद्यांच्या पाण्याचं व्यवस्थापन भारत सरकार कसं करणार हेही प्रश्न उद्भवतात.