ओडिशा किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांचे अद्वितीय ‘अरिबाडा’ दृश्य

Olive Ridley turtle : दरवर्षी ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर हजारो ऑलिव्ह रिडले समुद्री कासव अंडी घालण्यासाठी येतात. या अद्वितीय प्रक्रियेला ‘अरिबाडा’ असे म्हणतात. यंदा, रशिकुल्या किनाऱ्यावर तब्बल 6 लाख 82 हजार कासवांनी हजेरी लावली आहे.
स्टील उद्योग होणार डिकार्बनाईज !

Decarbonizing steel plants : केंद्र सरकारच्या धोरणांनुसार आपल्याला 2035 पर्यंत हे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण 50 टक्क्यावर आणायचं आहे. आणि 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचं ध्येय गाठायचं आहे. कार्बन उत्सर्जन न करणाऱ्या पद्धतीवर आधारित स्टील उद्योगांची निर्मिती करण्यासंदर्भातलं संशोधन पूर्ण झालं आहे. आयआयटी मुंबई संस्थेतल्या संशोधकांनी स्टील उद्योगातून कार्बन उत्सर्जन होऊ नये, यासाठी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. या प्रक्रिया पद्धतीचं नाव आहे हायड्रोजन बेस्ड डायरेक्ट रिडक्शन ऑफ आयर्न.
महाशिवरात्री निमित्त प्रयागराजमध्ये ‘नो व्हेहिकल झोन’

Mahakumbh 2025 : बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री निमित्ताने महाकुंभ मेळाव्यामध्ये शाही स्नान होणार आहे. यानंतर महाकुंभ मेळाव्याची सांगता होणार आहे. बुधवारच्या या शेवटच्या शाही स्नानासाठी जगभरातून अनेक भाविक प्रयागराजमध्ये येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या गर्दीसह वाहनांचीही गर्दी होऊन चेंगराचेंगरी सारख्या घटना घडू नयेत, व्यवस्थापनांवर तणाव येऊ नये यासाठी महाकुंभ मेळाव्याच्या आयोजकांनी या परिसरामध्ये ‘नो व्हेहिकल झोन’ जाहीर केला आहे.
जागतिक पातळीवर मनुष्यबळाचा तुटवडा होणार भारतासाठी संधी !

Human Resources : ‘भारतात टॅलेंटची कमतरता नाही’, असा नेहमीचा डायलॉग आहे. पण हे टॅलेंट कसं वापरायचं आणि इतक्या टॅलेंटेड लोकांना संधी उपलब्ध करुन देणं हे एक मोठं आव्हान बनत आहे. तरी येत्या काही काळात जागतिक पातळीवर मात्र कुशल कामगारांचा तुटवडा भासणार आहे, तेव्हा जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी भारत सज्ज असला पाहिजे.
सायबर क्राईम कॅम्पमध्ये अडकले 2 हजार भारतीय

Cyber Crime : खोट्या नोकरीच्या आमिषांना भुलून जवळपास दोन हजार भारतीय हे म्यानमार इथं सायबर क्राईम करणाऱ्या कॅम्पमध्ये अडकून पडल्याचं अहवालातून समोर आलं आहे.
जाहिरातीमुळे प्रेक्षकांचा वेळ घालवल्याबद्दल पीवीआर आयनॉक्स थिएटरला भरावा लागणार लाखोचा दंड

Inox Theater : थिएटरमध्ये गेल्यावर सिनेमा सुरू होण्याआधी थिएटरकडून दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती या पाहाव्याच लागतात. पण अर्धा तास जाहिराती दाखवून सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा वेळ वाया घालवला आणि त्याला मानसिक त्रास दिल्याबद्दल पीवीआर आयनॉक्स थिएटरला दंड भरावा लागणार आहे.
कृत्रिम बेटावर तयार होणार मुंबईतलं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ!

India’s First Offshore Airport : केंद्र सरकार मुंबईमध्ये तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार आहे. विशेष म्हणजे, हे विमानतळ समुद्रात कृत्रिम बेट तयार करून बांधले जाणार आहे.
तब्बल 63 वर्षांनंतर सुरू होणार उत्तरकाशीतले ‘हे’ गिर्यारोहण स्थळं!

Utterkashi Trekking routes : धार्मिक तीर्थस्थान, पर्यटन यांच्यासह उत्तराखंडमध्ये आणखीन एका समुहाची गर्दी असते ती म्हणजे गिर्यारोहकांची… भारत – चीन युद्धा दरम्यान बंद केलेली जनकताल आणि मुलिंग गिर्यारोहन मार्ग पुन्हा सुरू केले जाणार आहेत.
परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी नवीन कायदा का?

Immigration and Foreigners Bill 2025 : केंद्र सरकार लवकरच स्थलांतरीतांकरता नवीन कायदा आणणार आहे, हा कायदा 1983 च्या इमिग्रेशन कायद्याची जागा घेईल. यामुळे परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी नियम बदलणार आहेत. या कायद्याचं नाव ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल 2025 ’ असं आहे.
पार्ले-जी : मुंबईतील एका छोट्या कारखाना ते जगात सर्वाधिक विकलं जाणारं बिस्किट

Parle-G : 1938 मध्ये ‘पार्ले ग्लुकोज’ हे बिस्किट बाजारात आलं. अगदी कमी वेळातच हे बिस्किट बाजारात खूप लोकप्रिय झालं. जवळपास 50 वर्षे हे बिस्किट बाजारात खूप प्रसिद्ध होते.
45 टक्के हिमाचल प्रदेशाला भूस्खलनाचा धोका !

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमधल्या जवळपास 45 टक्के भौगोलिक प्रदेशाला येत्या काही काळात भुस्खलन, हिमस्खलन आणि पूर परिस्थितीचा धोका असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
भारत – सोलार सुपरपॉवर !

Solar Power : भारत सरकारने 31 जानेवारी 2025 रोजी 100 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचा टप्पा पूर्ण केला आहे. सौर पॅनल, सौर पार्क आणि छतावरील सौर प्रकल्प यासारख्या उपक्रमातून सरकारने हे उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. या सौर ऊर्जा निर्मितीमध्ये राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत.