तुम्ही खात असलेले ‘हे’ पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी विषारी ठरू शकतात!

FSSAI : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात काही लोकप्रिय आणि मोठे ब्रँड्सच्या रेस्टॉरंट्सवर अचानक छापे टाकले. FSSAI ने केलेल्या या तपासणीत त्यांनी काही पदार्थ तपासण्यासाठी घेतले. या तपासणीतून लोकप्रिय असणाऱ्या अनेक ब्रँड्सच्या पदार्थामध्ये कृत्रिम रंगांचा, घटकांचा अतिप्रमाणात वापर केल्याचे आढळून आले आहे. 
[gspeech type=button]

आजकाल आपण सगळेच बाहेरचे पदार्थ खातो. कधी वेळ वाचवण्यासाठी, तर कधी फक्त चवीसाठी. पिझ्झा, बर्गर, बिर्याणी, समोसे, नमकीन… ही नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. पण तुम्हाला माहीत आहे का, आपण जे पदार्थ इतक्या आवडीने खातो, तेच आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात?

2025 मध्ये, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात काही लोकप्रिय आणि मोठे ब्रँड्सच्या रेस्टॉरंट्सवर अचानक छापे टाकले. FSSAI ने केलेल्या या तपासणीत त्यांनी काही पदार्थ तपासण्यासाठी घेतले आणि त्याचा जो अहवाल आला तो धक्कादायक होता.

कोणत्या ब्रँडमध्ये काय सापडले?

मॅकडॉनल्ड्स: मॅकडॉनल्ड्सच्या फ्राइज आणि इतर तळलेल्या पदार्थांमध्ये कृत्रिम रंग (Artificial Colours) वापरले असल्याचे आढळले. हे रंग खाण्यासाठी योग्य नसतात आणि आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

केएफसी: केएफसीमध्ये तळण्यासाठी वारंवार वापरलेले तेल (Reused Cooking Oil) वापरले जात असल्याचे आढळून आले. एकाच तेलात अनेक वेळा पदार्थ तळल्यामुळे तेलातील पोषक तत्वे नष्ट होतात आणि त्यात हानिकारक घटक तयार होतात, जे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

बर्गर किंग: बर्गर किंगच्या मेयोनीजमध्ये हानिकारक जीवाणू सापडले. हे जीवाणू पोटाच्या अनेक समस्या निर्माण करू शकतात.

डोमिनोज: डोमिनोजच्या काही पदार्थांमध्ये एक्सपायर्ड झालेल्या खाण्याचा गोष्टी वापर केला जात होता. एवढंच नाही, तर या गोष्टी पुन्हा नवीन लेबल लावून वापरल्या जात आहेत आणि हे कायद्याने गुन्हा आहे.

पिझ्झा हट: पिझ्झा हटच्या सॉसमध्ये खाण्यासाठी योग्य नसलेले पदार्थ (Non-Food Grade Items) आढळले. अशा पदार्थांमुळे आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो.

हल्दीराम: भारतातील एक लोकप्रिय नमकीन ब्रँड असलेल्या हल्दीरामच्या काही पदार्थांमध्ये निकृष्ट दर्जाचे तेल वापरले जात असल्याचे आढळले. स्वस्त आणि खराब तेल वापरल्याने पदार्थांची गुणवत्ता खराब होते.

बिर्याणी ब्लूज: बिर्याणी ब्लूजच्या बिर्याणीमध्ये जास्त प्रमाणात कृत्रिम फ्लेवर्स आढळले. या फ्लेवर्समुळे बिर्याणीला चांगली चव येते, पण ते आरोग्यासाठी चांगले नसतात.

FSSAI ने जर देशभरात अशा तपासण्या सगळीकडे केल्या, तर काय होईल? कदाचित यापेक्षाही भयानक सत्य आपल्या समोर येईल. FSSAI ने या ब्रँड्सना कठोर चेतावणी दिली आहे आणि त्यांच्यावर कारवाई पण केली आहे.

तसंच, ग्राहक म्हणून आपण जागरूक राहणे खूप महत्त्वाचे आहे. कोणताही पदार्थ घेताना त्याचे पॅकिंग, एक्सपायरी डेट, गुणवत्ता तपासा. जर काही चुकीचे आढळले तर लगेच FSSAI किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Fitness route of PM Narendra Modi : वयाच्या 75 व्या वर्षी पंतप्रधान आपलं आरोग्य कसं जपतात? याविषयी त्यांनी लेक्स फ्रीडमन
Amoebic Meningoencephalitis : केरळमध्ये अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस या आजारामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या आजारामध्ये ‘नेग्लरिया फौलेरी’ नावाच्या सूक्ष्म जीव
Physiotherapist : भारतातील फिजिओथेरेपिस्ट आपल्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावू शकत नाहीत, असा निर्णय आरोग्य सेवा महासंचालनालयाने घेतला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ