भारताच्या पोटात पाकिस्तान न बनण्याची गोष्ट…

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीर आजही धगधगत आहे. एवढ्या वर्षात काश्मीरचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. एवढ्यात सुटण्याची चिन्हंही नाहीत. या परिस्थितीत हैदराबादमध्ये वेळीच लष्करी कारवाई झाली नसती तर, निझामाला स्वतंत्र राष्ट्र मिळालं असतं किंवा हैदराबाद पाकिस्तानचा भाग झाला असता.

श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2025′: परंपरा आणि बॉलिवूडचा अनोखा संगम!

Shreshth Maharashtra’s Mangala Gaur 2025 : महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ने सलग दुसऱ्या वर्षी ‘श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2025’ स्पर्धेचं आयोजन केलं होतं. रविवार, 13 जुलै 2025 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुंबईतल्या एकूण 13 संघांनी सहभाग घेतला होता

मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

जागतिक वारसा समितीच्या 47 व्या बैठकीत ‘भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले ‘ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी हे आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणार आहेत. मराठा लष्कराची मुहूर्तमेढ 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात रोवली गेली. ही मान्यता मिळवणारी भारताची ही 44 वी स्थळे बनली आहेत. यामुळं मराठा साम्राज्याच्या इतिहास, मराठा किल्ल्यांचे स्थापत्यशास्त्र, भारतीय प्रादेशिक अस्मिता आणि ऐतिहासिक ठेवा यांची जागतिक स्तरावर दखल घेतली आहे.

“महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम” – काय आहे हा कायदा ?

Special Public Security Act : महाराष्ट्र सरकारने आणलेले हे विधेयक संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचं अनेक संघटना आणि राजकीय पक्ष म्हणत आहेत. यामुळे सरकारला अमर्याद अधिकार मिळतील आणि ते विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी याचा वापर करू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.

बालकामगारांची सुटका आणि पुनर्वसनाबाबत महाराष्ट्राचे धोरण देशात लागू

Child Labour Act – 2016 च्या सुधारित बालकामगार आणि किशोरवयीन कायद्यानुसार चौदा वर्षाखालील मुले आपल्या सुट्टीच्या दिवशी किंवा फावल्या वेळात कौटुंबिक व्यवसायात झेपेल ती मदत करू शकतात. तसेच 15 ते 18 वयोगटाला किशोरवयीन कायद्याच्या कक्षेत आणलं गेलं आहे. या मुलांना काही मर्यादांवर हलकं काम करण्याची आणि त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित होईल, अशी कामं करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

बकरी ईद

Eid al-Adha : बकरी ईद हा मुस्लीम बांधवाचा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण मुस्लीम कॅलेंडरनुसार जुल हिज्जा या 12 व्या महिन्याच्या 10 तारखेला साजरा केला जातो.

कामगार संघटना आणि कायदा

Labour Union : महाराष्ट्राच्या जडणघडणीत कामगार चळवळीचा खूप मोठा वाटा आहे. पण गेल्या काही वर्षात कामगार संघटना दुर्बल झाल्याचे दिसते. कामगार संघटना आणि कामगार यांनी सजगपणे काम केलं तर, कामगारांचं भलं होत असल्याचं पाहायला मिळतं. कामगार संघटनांनी कामगारांच्या फायद्यासाठीच काम करावं याकरता, कामगार संघटनांनांही कायद्याच्या चौकटीत बसवण्यात आले आहे. कामगार सह-आयुक्त शिरिन लोखंडे यांच्याकडून कामगार संघटनांचे कामकाज, त्यांच्यातील वाद आणि कामगार विभाग याबद्दल सविस्तर माहिती.

कामगारांच्या तक्रारी- ऑनलाईन दखल आणि न्यायालये

Labour Court : आम्ही ‘आपलं सरकार’ पोर्टलवर कामगार विभागाकडे तक्रार केली. पण काही उपयोग झाला नाही अशी टीका बरेच जण करतात. कामगार विशेष सिरिजमध्ये ‘आपलं सरकार’ पोर्टलवर कामगारांच्या तक्रारींची दखल कशी घेतली जाते, याबाबत कामगार सहआयुक्त शिरिन लोखंडे यांच्याकडून घेतलेली माहिती

मराठा पर्यटन ट्रेन: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांची सफर आता एकाच ट्रेनमधून

Maratha Tourist Train : महाराष्ट्राच्या शौर्यगाथांचे साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची सफर आता एकाच ट्रेनमधून करता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठा पर्यटन ट्रेन’ सुरू करण्यात येत आहे.

कामगार नुकसानभरपाई कायदा

कामगार: कामगाराला त्याच्या कामधंद्यामुळे किंवा त्याच्या ओघात उद्भवलेल्या अपघातामुळे शारीरिक इजा पोहोचली तर संबंधित कंपनीने कामगाराला भरपाई देणं हे बंधनकारक आहे. कामगार नुकसानभरपाई अधिनियम 1923 द्वारे ही नुकसानभरपाई मिळते. महाराष्ट्राच्या कामगार सह-आयुक्त शिरिन लोखंडे यांच्याकडून ‘कामगार नुकसानभरपाई कायद्या’बद्दलची सविस्तर माहिती

बटाटा, मिरचीला आपल्याकडं रुजवणारी ‘दापोडी इस्टेट’ – भाग 1

वसाहतवादी कालखंडात वसाहतींनी ‘बाहेरून’ आलेली पिकं स्वीकारली. कधी स्वखुशीनं, कधी जबरदस्तीनं. वसाहतीतल्या लोकांचं पोट भरण्यासाठी काहीवेळा ही बाहेरची पिकं आणली गेली. तरी त्यात आर्थिक, राजकीय हितसंबंधही गुंतले होतेच. युरोपियन नागरिकांना भारतात मायदेशाची आठवण येऊ नये, यासाठी ब्रिटिशांनी आपल्या देशात परदेशी फळं आणि भाज्यांची लागवड केली.

मराठा आरमार

“आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्‍वतच. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे”

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ