पॅशन ते व्यवसाय, ‘सायली राजाध्यक्ष सारीज’चा प्रवास

Sayali Rajadhyaksha : अत्यंत ग्रेसफुली कोणतीही साडी कॅरी करू शकणाऱ्या, सॉल्ट ॲण्ड पेपर लूक अत्यंत आत्मविश्वासाने कॅरी करणाऱ्या, मोजकीच पण सुंदर ॲक्सेसरी वापरणाऱ्या, परफेक्ट फिटिंगचे ब्लाऊज घालून साडीची शोभा शतपटीने वाढविणाऱ्या आणि एकूण व्यक्तिमत्त्वातच क्लासीनेस असणाऱ्या, ऑफिशियली मॉडेलिंगचे प्रशिक्षण न घेतलेल्या पण कुठल्याही मॉडेलपेक्षा कमी नसणाऱ्या- अश्या कोण? असा जर प्रश्न विचारला तर अर्थातच उत्तर येतं- सायली राजाध्यक्ष! आणि त्या फक्त मॉडेल नाहीत बरं का, तर सायली राजाध्यक्ष सारीज- या ब्रँडच्या निर्मात्या, आंत्र्यप्रुन्यर आणि यशस्वी उद्योजकही आहेत.
पर्माकल्चरची तत्वे

Permaculture principles : पर्माकल्चरची बारा तत्वे एखाद्या भिंगांसारखी वापरता येतात. कोणताही प्रोजेक्ट डिझाईन करताना, डिझायनरने वापरायची ही मार्गदर्शक चौकट आहे. ह्या तत्वांना प्रश्नार्थक बनवणेही बऱ्याचदा सोयीचे ठरते.
परदेशी शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे

Documentation for foreign University Admission : जीआरई, सॅट आणि टोफेल दिल्यानंतर अमेरिकन युनिव्हर्सिटींना अॅप्लिकेशन करायला सुरुवात होते. अमेरिकन युनिव्हर्सिटीत अर्ज करणे ही थोडी किचकट बाब असते असे वाटते. पण तसे नाहीय. प्रत्येक युनिव्हर्सिटीने त्यांच्या वेबसाइटवर योग्य ती माहिती दिलेली असते. ती नीट समजून घेऊन अॅप्लिकेशन करणे उत्तम.
गवताच्या मॅटवरून ऑलिम्पिकची उंच उडी

Sarvesh kushare in Olympics : “प्रतिस्पर्ध्याची उंची, शरीरयष्टी पाहून घाबरायचं नाही. आपल्या ट्रेनिंगवर लक्ष द्या, स्वत:वर विश्वास ठेवा,” हाच मंत्र सर्वेशनं लक्षात ठेवला आणि अशक्य ते शक्य करुन दाखवलं. ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत आपण पात्र ठरु की नाही याबद्दल जेव्हा त्याचा विश्वास डळमळीत झाला, तेव्हा त्यानं नीरजनं सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवली. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि लढण्याचं बळ मिळालं असं सर्वेश सांगतो.
आमच्या गावात, आम्हीच सरकार

PESA law : आदिवासी, सांस्कृतिक जडणघडण, रूढी परंपरा, न्याय निवाडा पद्धती या भिन्न आहे. संविधानामध्ये याचा सर्वंकष विचार केला आहे. 2 मार्च 2014 ला महाराष्ट्र राज्याने पेसा कायद्याचे नियम लागू केले. पेसा कायद्याने अनुसूचित क्षेत्रातील या ग्राम पंचायतींना व ग्रामसभांना अतिरिक्त हक्क आणि जबाबदाऱ्या मिळाल्या. स्थायी समित्या, अबंधित निधे यासारख्या विशेष तरतुदी केल्या आहेत.
दुचाकीवाल्यांना झुकतं माप… चारचाकीवाले मात्र खलनायक!

हेल्मेट न घालता, झिकझॅक करत दुचाकीस्वार मांजराच्या पिल्लांसारखे पायात अडखळतात, तेव्हा चारचाकीच्या चालकाच्या काळजाचा ठोका चुकतो. चारचाकीवाले काय म्हणे तर अभिजन? आणि बाइकवाले बहुजन? म्हणून बाइकवाल्यांना झुकतं माप? पण चारचाकीवाल्यांची बाजू थोडी ऐकून घ्यायला काही हरकत नाही. बाइकवाल्यांचं काहीच चुकत नाही असं म्हणणंही धारिष्ट्याचंच.
मला इन्शुरन्सची गरजच नाहीये.. !!

आजच्या काळात वाढलेले उत्पन्न आणि त्याबरोबर उंचावलेली लाईफस्टाईल ( Lifestyle ) ,अंगावर असलेली मोठ्या रकमेची कर्ज आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वाढ झालेले वैद्यकीय खर्च, या सगळ्यामुळे निर्माण झालेल्या संभाव्य मोठ्या आर्थिक फटक्यापासून जर आपल्याला संरक्षण हवे असेल, तर इन्शुरन्स घेण्यावाचून कोणताही पर्याय नाही.
‘पैठणी वस्त्रा’ पलीकडचे पैठण

पैठणच्या प्राचीन वैभवाची साक्ष तेथील विस्तीर्ण पांढरीच्या टेकड्या देतात. या वैभवाचा शोध प्रथम निजामकालीन पुरातत्त्व खात्याने 1936-37 मध्ये घेतला. या उत्खननात 4थे शतक ते 8वे शतक या काळातील विटांनी बांधलेली दोन मंदिरे आढळली. या दोन मंदिरांचा पुढील सखोल अभ्यास ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खाते’ आणि ‘सोसायटी फॉर साउथ एशियन स्टडीज’ यांनी 1996-1999 दरम्यान संयुक्तपणे केला.
क्लाएंट कन्सल्टेशन – सलोन सर्व्हिसची महत्त्वाची पायरी

नव्याने एखाद्या सलोनमध्ये आपण जातो तेव्हा अनेक भावना असतात मनात. सर्व्हिस, किंमत, value for money, प्रोडक्ट्स, कम्फर्ट, हायजीन आणि बरंच काही. अशावेळी जर का आपली अंटेन्डंट आपल्याशी अगत्याने बोलत असेल तर आपला अर्धा संकोच गळतो. अनेकदा consultation सुरू झालं की, आपल्या ब्युटिशियनशबरोबर गप्पांचं एक सुंदर सेशनही सुरू होतं.
मराठी स्वयंपाकातली महाराणी – पुरणपोळी

पुरणपोळी हा पदार्थ मराठी गोड पदार्थातील बडा ख्याल आहे. पुरणपोळीचा संदर्भ शालिवाहन काळात आढळतो. शालिवाहन शककर्ते राजे आजच्या कर्नाटकात सुद्धा राज्य करत असल्याने पुरणपोळी उर्फ होळिगे हा कर्नाटकाचा सुद्धा गोड पदार्थ झाला. गव्हाच्या पिठाची पातळ कणिक मळून त्यात हरभरा डाळ आणि गूळ किंवा साखर घालून तयार केलेले पुरण भरून, लाटून भाजलेली पोळी म्हणजे पुरणपोळी !
वरदराजन मुदलियार : मुंबईच्या अंडरवर्ल्डचा किंगपिन

1970 च्या उत्तरार्धापासून वरदराजनच्या अधोगतीला सुरुवात झाली. याचं कारण होतं, ते दाऊदचा झपाट्यानं झालेला उदय. त्यामुळं मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्येही झपाट्यानं बदल झाले. मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचाही गुन्हेगारांवर दबाव वाढायला सुरुवात झाली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणजे वरदराजन या सगळ्या स्पर्धेत मागे पडला आणि त्याचा दबदबा कमी व्हायला सुरुवात झाली.
सायलेंट किलर्स

“सायलेंट किलर्स” ( Silent killers) म्हणजे शांतपणे नकळत मृत्यू देणारे. काही आजारांना सायलेंट किलर्स म्हटले जाते. याची मुख्य उदाहरणे आहेत – मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाब (High blood pressure) या आजारांना नकळत मृत्यू देणारे आजार म्हणजेच सायलेंट किलर्स